कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थानचा गुजरातवर 5 गड्यांनी विजय

06:41 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगढ

Advertisement

2023 च्या क्रिकेट हंगामातील सुरू असलेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील येथे शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात दीपक हुडा आणि दीपक चहर यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर राजस्थानने गुजरातचा 5 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील अन्य ठिकाणी झालेल्या विविध सामन्यात मुंबईने केरळचा 8 गड्यांनी, हरियाणाने बिहारचा 10 गड्यांनी, बंगालने बडोदा संघाचा 95 धावांनी पराभव केला. तामिळनाडूने गोवा संघावर 33 धावांनी मात केली.

Advertisement

राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामन्यात गुजरातचा डाव 128 धावात आटोपला. राजस्थानच्या दीपक चहरने 41 धावात 6 गडी बाद केले. त्यानंतर राजस्थानने 28.4 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. राजस्थानच्या हुडाने 79 चेंडूत 76 धावा झोडपल्या.

अ गटातील झालेल्या सामन्यात मुंबईने केरळचा 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या केरळचा डाव 231 धावात आटोपला. सचिन बेबीने शानदार शतक (104), संजू सॅमसनने 55 धावा जमविल्या. मुंबईतर्फे अवस्थीने 4 तर तुषार देशपांडेने 3 गडी बाद केले. त्यानंतर पावसाच्या अडथळ्यामुळे मुंबई संघाला विजयाचे नवे उद्दिष्ट दिले. मुंबईला 30 षटकात 159 धावांची जरूरी होती. मुंबईने 24.2 षटकात 2 बाद 161 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला.

बंगाल आणि बडोदा यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगालने 50 षटकात 8 बाद 314 धावा जमविल्या. त्यानंतर बडोदा संघाचा डाव 44.2 षटकात 219 धावात आटोपला. बंगालने हा सामना 95 धावांनी जिंकला. तामिळनाडू आणि गोवा यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडूने 50 षटकात 8 बाद 296 धावा जमविल्या. त्यानंतर गोवा संघाचा डाव 263 धावात आटोपला. तामिळनाडूच्या साई सुदर्शनने शानदार शतक झळकविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article