Ratnagiri News : कोंडये पांगरे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प
12:54 PM May 10, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
पावसामुळे आंबा बागायतदार मात्र चिंतेत
Advertisement
राजापूर : शनिवारी सकाळपासूनच वाढलेल्या उष्म्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. यामध्ये जास्त प्रभाव हा केळवली पन्हळे परिसरात होता. ऐन आंबा पिकाच्या हंगामात पडलेल्या पुन्हा एकदा या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार मात्र चिंतेत सापडला आहे.
तर दुपारी साडेतीनच्या सुमारास कोंडये पांगरे रस्त्यावर जुनाट झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामध्ये शहरातील ओगलेवाडीत एका घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले.
Advertisement
Advertisement