For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी निवडणूक लढतोय - राजन तेली

04:26 PM Nov 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी निवडणूक लढतोय   राजन तेली
Advertisement

राजन तेलींची प्रचारात आघाडी

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी,पर्यटनातून मतदारसंघाच्या विकासासाठी,सावंतवाडी शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी मी निवडणूक लढतोय त्यामुळे तुम्ही सर्वांनी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी केले.सावंतवाडी बसस्थानकाचे काम ७ वर्षांहून अधिक काळ अर्धवट स्थितीत असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकाराला उत्तरदायी असणार्‍या दिपक केसरकरांना या निवडणुकीत घरी बसविण्याची हीच संधी आहे असेही त्यांनी सांगितले.

सावंतवाडी तालुक्यातील बांदा, डेगवे ,साटेली,आरोंदा,कवठणी,तळवणे ,कास, पाडलोस ,सातोसे ,मडुरा आदी गावात प्रचारानिमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते . यावेळी या दौऱ्यात उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार ,तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,राघवेंद्र नार्वेकर ,रवींद्र म्हापसेकर, नम्रता झारापकर ,साधना कळंगुटकर ,प्रशांत नाईक, आबा केरकर, चंद्रकांत राणे ,भारती कासार,संदीप सुकी ,शिवा गावडे ,लक्ष्मण पेडणेकर,फिलिप्स रॉड्रिक्स, मंथन गवस ,न्हानू भाईप, उदय पारिपत्ये, महेश मांजरेकर गोविंद कवठणकर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

श्री तेली पुढे म्हणाले या मतदारसंघात भरीव काम करण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. जर एका वर्षात या मतदारसंघाचा विकास झालेला नसेल तर मी तुमच्याकडे पुन्हा येणार नाही. या ठिकाणी जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र मागच्या काळात केसरकर या खात्याचे वनमंत्री होते. त्यांना कुठच्या खात्याचा अभ्यासच नसल्यामुळे ते या ठिकाणी काम करण्यास कुचकामी ठरले. प्रत्येक निवडणुकीत मी माझी जमीन विकून निवडणूक लढतो असे सांगणाऱ्या केसरकारांची अचानक प्रॉपर्टी वाढली कशी? त्यामुळे केसरकर खोटे बोलतात हे त्यांनी पुन्हा एकदा आपणच सिद्ध केलेले आहे. केसरकर यांना पुन्हा पुन्हा निवडून देऊन या ठिकाणचा विकास खुंटला आहे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेनेला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. तर यावेळी एका एकाच्या मतात परिवर्तनाची क्षमता आहे त्यामुळे तुम्हीच या ठिकाणी परिवर्तन करा. या मतदारसंघाची परिस्थिती भयानक झाली आहे. जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता आपल्याला उमेदवार म्हणून लाभला आहे . त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा यांनी सांगितले. तर कास येथे मशाल हाती घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Advertisement
Tags :

.