For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Legislative Council Election कोकणातून विधानपरिषदेसाठी शिवसेनेतून राजन साळवींचं नाव निश्चित?

05:44 PM May 23, 2026 IST | NEETA POTDAR
legislative council election  कोकणातून विधानपरिषदेसाठी शिवसेनेतून राजन साळवींचं नाव निश्चित
Advertisement

सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूकांची तयारी सुरु आहे. पडद्यामागच्या हालचाली वेगवान होत असताना आता कोकणातून विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून राजन साळवी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. शिवसेना साळवींना उमेदवारी देऊ शकेल अशी चर्चा राजकिय वर्तुळात आहे.  कोकणातील रायगड - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विधानपरिषद जागेसाठी राजन साळवी यांच्या निवडणूक लढवू  शकतील असा प्राथमिक अंदाज आहे.

Advertisement

एबीपी माझाच्या वृत्तानुसार याबद्दल बोलताना राजन साळवी म्हणाले पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवायला आवडेल. माझी इच्छा मी माझ्या पक्षातील नेत्यांकडे व्यक्त केलेली आहे अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी 'एबीपी माझा'कडे दिली आहे. सध्या शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असल्याचा उल्लेख यावेळी राजन साळवी यांनी केला.

आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना साळवी म्हणाले पक्ष देईल तो आदेश मान्य असेल. तसेच महायुतीतील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. काही जागांची अदलाबदल देखील होऊ शकतात. असं देखील साळवी यांनी सांगितलं.

Advertisement

शिवसेनेला भाजप समाधानी करु शकेल?

विधानपरिषदेसाठी महायुतीतील तीन महत्त्वाच्या पक्षांमध्ये एकमत कितपत होईल ? हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युल्यानुसार  भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी २ असा होता. मात्र, शिवसेनेला एवढ्या कमी जागांवर समाधानी करणं भाजपच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरणार आहे.

कारण शिवसेनेकडून ७ जागांची आग्रही मागणी धरण्यात आली. शिवसेनेने अशा काही जागांवर दावा केला आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अप) आणि भाजपच्या वाट्याला आलेल्या जागा होत्या. त्या जागांमध्ये अदलाबदल करत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर पण दावा केला गेला. अशातच, जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत होताना दिसते आहे.

Advertisement
Tags :

.