राजा वडिंग घोटाळ्यांचा राजा : बिट्टू
पंजाबमध्ये पोटनिवडणूक : काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये वाक्युद्ध
वृत्तसंस्था/ गिद्दडबाहा
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत बिट्टू आणि काँग्रेस खासदार अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्यात आता गिद्दडबाहा पोटनिवडणुकीवरून वाक्युद्ध पेटले आहे. गिद्दडबाडामध्ये दोन्ही नेते परस्परांवर टीकेचा भडिमार करत आहेत. रवनीत बिट्टु हे भाजप उमेदवार मनप्रीत बादल यांच्याकरता प्रचार करत आहेत. बिट्टू या पोटनिवडणुकीत विजय मिळवत लुधियाना लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाचा वचपा काढू पाहत आहेत.
बिट्टू यांनी एक प्रचारसभेत राजा वडिंग यांना घोटाळ्यांचा राजा असे संबोधिले आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल राजा यांनी बिट्टू यांना हरलेला केंद्रीय मंत्री असे संबोधिले आहे. तर दुसरीकडे बिट्टू यांच्या शेतकऱ्यांच्या संपत्तीच्या तपासणीच्या वक्तव्यावरही राजा वडिंग यांनी टीका केली आहे.
बिट्टू यांनी राजकीय इमान बदल्यावर जी भूमिका अवलंबिली आहे, ती पाहून मी थक्क होत आहे. बिट्टू हे यापूर्वी भाजप विरोधात बोलायचे आणि आता भाजपच्या वतीने शेतकऱ्यांनी तालिबानी संबोधित करत चौकशीची भीती दाखवत आहेत. बिट्टू हे अशाप्रकारची वक्तव्यं करून पक्षश्रेष्ठींची मर्जी मिळवू पाहत असल्याचा दावा राजा वडिंग यांनी केला आहे.