For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : राज-उद्धव ठाकरे एकत्र; सोलापुरात जल्लोष

05:43 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   राज उद्धव ठाकरे एकत्र  सोलापुरात जल्लोष
Advertisement

                            ऐतिहासिक घडामोडीमुळे शहरभर उत्साहाचे वातावरण

Advertisement

सोलापूर : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्याची घोषणा करण्यात आली. दोन भाऊ पुन्हा एकत्र आल्याने सोलापुरात या ऐतिहासिक घडामोडीचे स्वागत करत सोन्या मारुती गणपती मंदिरात गणपतीची आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मनसैनिक व शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला.

दोन भाऊ एकत्र येणे म्हणजेमराठी माणसाच्या ऐक्याची वज्रमूठ असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हा एकत्रितपणा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्तकेला आहे.

Advertisement

मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड, मनसे अजय जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दासरी, शहर प्रमुख महेशधाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके, जितेंद्र टेंभुर्णीकर, सुभाष माने, विजय पुकाळे, पवन देसाई, बाळासाहेब गायकवाड, आबा सावंत, सुरेश जगताप, गणेश पाटील, गोविंद बंदपट्टे, बंटी बेलमकर, वैभव रंपुरे, अनिकेत उपासे, समर्थ माळगे, अभी इरकल, सैपन जामखंडी व असंख्य शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.