For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शिवतीर्था’वर ठाकरे बंधूंची एकजूट; 4 ऑक्टोबरला मुंबईत विराट जनमोर्चाची हाक

01:07 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘शिवतीर्था’वर ठाकरे बंधूंची एकजूट  4 ऑक्टोबरला मुंबईत विराट जनमोर्चाची हाक
Advertisement

मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त जनमोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत आपली भूमिका मांडली. निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करताना भाजपकडून त्यावर आक्षेप का घेतला जातो, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी, “खाई त्याला खवखवे” अशी प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त आहे.

4 ऑक्टोबरचा मोर्चा मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, इतर राजकीय पक्ष तसेच नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा मोर्चा SIR प्रक्रियेविरोधात आणि मतदार यादीच्या पुनरावलोकनाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येत आहे.

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार, मोर्चाच्या मार्गाबाबत भायखळा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा उल्लेख करण्यात आला आहे. मोर्चात पक्षांचे झेंडे न वापरता तिरंगा ठेवण्याची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

या संयुक्त आंदोलनामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार असून, 4 ऑक्टोबरच्या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.