For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

UPI व्यवहारांवरील शुल्काला राज ठाकरेंचा विरोध; सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट

05:00 PM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
upi व्यवहारांवरील शुल्काला राज ठाकरेंचा विरोध  सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट
Advertisement

मुंबई, प्रतिनिधी : 15 ऑक्टोबरपासून ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र UPI पर्सन-टू-मर्चंट व्यवहारांवर 0.4 टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू होणार आहे. या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Advertisement

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर ‘दारावरची टकटक!’ या शीर्षकाखाली पोस्ट करत या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. UPI व्यवहारांवर सरसकट शुल्क नसले तरी शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे व्यापारी आणि ग्राहकांना डिजिटल व्यवहारांच्या ‘सापळ्यात’ अडकवले जात असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, नव्या व्यवस्थेनुसार ₹ 2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र व्यापारी व्यवहारांवर सामान्यतः 0.4 टक्के MDR लागू होईल. ₹ 75, 000 किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहारांसाठी हे शुल्क प्रति व्यवहार ₹300 इतके मर्यादित असेल. मात्र, ग्राहकांकडून UPI वापरासाठी थेट शुल्क आकारले जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) व्यवहार तसेच ₹2,000 पर्यंतचे व्यापारी व्यवहार MDRमधून मुक्त राहतील.

Advertisement

या निर्णयाला व्यापारी आणि पेट्रोल पंप चालकांकडूनही विरोध होत असून, मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी 15 ऑक्टोबरपासून UPI पेमेंट स्वीकारणे बंद करण्याचा इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे UPI व्यवहारांवरील नव्या MDR व्यवस्थेवरून राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा वेग आला आहे.

Advertisement
Tags :

.