For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Raj Thackeray X Post "निरंकुश सत्ता पूर्णपणे भ्रष्ट करते" राज ठाकरेंची अमित साटम यांच्याविषयी फडणविसांना उद्देशून X पोस्ट

04:27 PM Jul 04, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
raj thackeray x post   निरंकुश सत्ता पूर्णपणे भ्रष्ट करते  राज ठाकरेंची अमित साटम यांच्याविषयी फडणविसांना उद्देशून x पोस्ट
Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लिहिलेल्या एका X पोस्टची चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी अमित साटम यांनी विधीमंडळ परिसरात संवेदनशील मुद्द्यावर केलेल्या हास्यविनोदावर नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही या असंवेदनशीलतेवर एक पाऊलही उचलले नाही असं  राज ठाकरे यांनी X वरच्या पोस्टमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले आहे.

Advertisement

राज ठाकरे काय म्हणाले?

फडणवीस यांना उद्देशून लिहिलेल्या आणि 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, भाजपचे केंद्रीय नेतृत्व “सत्तेच्या गर्वाने माजले आहे”, असा देशभरातील लोकांचा विश्वास आहे. “… पण हा संसर्ग आता आपल्या राज्यात पसरला आहे का? आणि तुम्ही त्याला पसरू देत आहात का?”.

Advertisement

महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये फरक स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाची त्याच्या परिपक्वता आणि सभ्यतेसाठी फार पूर्वीपासून प्रशंसा केली जाते.

"पण गेल्या काही वर्षांत हे वेदनादायकपणे स्पष्ट झाले आहे की, तुम्ही उत्तरेकडील त्या काही प्रतिगामी विचारसरणीच्या राज्यांच्या बरोबरीने येऊ लागला आहात," असे राज ठाकरे म्हणाले.

साटम यांचे नाव न घेता टीका

साटम यांचे थेट नाव न घेता, राज ठाकरे यांनी मुंबईतील दोन नागरी दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने केलेल्या वक्तव्यांवरून निर्माण झालेल्या अलीकडील वादाचा उल्लेख केला. "तुमच्या आमदारांपैकी आणि पदाधिकाऱ्यांपैकी एक जण लोकांच्या मृत्यूवर आनंदाने हसतो, आणि त्याच्या विरोधात एकही पाऊल उचलले जात नाही," असे म्हणत त्यांनी 'सत्ता भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता पूर्णपणे भ्रष्ट करते' या सुप्रसिद्ध उक्तीचा संदर्भ दिला.

अमित साटम वादात का सापडले?

३० जून रोजी मुंबईच्या चेंबूर परिसरात एका स्कूल बसवर झाड कोसळून एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी नालेसफाईचं काम सुरु असताना उघड्या ठेवलेल्या मॅनहोलमध्ये पडून एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या दोन घटनांनंतर प्रशासन आणि सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. मात्र भाजप मुंबई अध्यक्ष आणि विधीमंडळ सदस्य अमित साटम यांनी या दोन घटनांवर विधीमंडळ परिसरात हास्यविनोद केल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. 

“देवेंद्र फडणवीस एक सुसंस्कृत, संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात होते — महाराष्ट्राला आणि मलाही असेच वाटत होते. पण जेव्हा अशा गोष्टी घडतात आणि तुम्ही किंचितही खेद व्यक्त करत नाही, तेव्हा तुमच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते,” असे त्यांनी लिहिले.

हेही वाचा : Sanjay Raut on Amit Satam”निर्लज्जपणे दात काढतोय”अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊत भडकले

बाळासाहेब आणि पवार साहेबांचा उल्लेख

राज्यातील एका वेगळ्या राजकीय परंपरेची आठवण करून देताना राज ठाकरे म्हणाले की, सर्वपक्षीय नेत्यांनी केवळ एकाच राजकीय गटाचे आहेत म्हणून आपल्या सहकाऱ्यांना कधीही पाठीशी घातले नाही. “मी गेली ३७ वर्षे राजकारणात सक्रिय आहे.

आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी पुढे लिहिले "जेव्हा कधी महाराष्ट्रातील एखाद्या नेत्याकडून चूक झाली किंवा तो घसरला, तेव्हा राज्यातील तत्कालीन नेत्यांनी केवळ तो आपलाच आहे म्हणून त्याला कधीही पाठीशी घातले नाही. बाळासाहेब असोत , पवारसाहेब असोत , प्रमोदजी असोत किंवा इतर कोणीही असो याच कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची देशभरात एक वेगळी ओळख होती.

Advertisement
Tags :

.