For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sonam Wangchuk | सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरे आक्रमक; सरकारला धरलं धारेवर

11:02 AM Jul 16, 2026 IST | NEETA POTDAR
sonam wangchuk   सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरे आक्रमक  सरकारला धरलं धारेवर
Advertisement

नवी दिल्ली - सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक सध्या नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 59 वर्षांच्या सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. पेपरफुटी आणि शैक्षणिक घोटाळ्यांच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्यांची तब्येत सातत्याने ढासळताना दिसत असून अनेकांकडून त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.त्यांच्या या उपोषणावर राज्यभरातुन अनेक प्रतिक्रीया उमटत आहे.. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या उपोषणासंदर्भात यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे..राज ठाकरे यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत सरकारविरोधात राग व्यक्त केला आहे..

Advertisement

राज ठाकरे यांनी त्याच्या पोस्टमध्ये लिहले आहे की, सोनम वांगचूक हे ज्या मुद्यांसाठी आमरण उपोषण करत आहेत, ती रास्त मागणी आहे आणि सरकारने ती मागणी मान्य केली पाहिजे, असं मत राज ठाकरेंनी पोस्टमधून व्यक्त केलं आहे.पुढे ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी निशाणा साधला. देशात आंदोलनांसाठी असलेल्या लोकशाहीच्या जागेलाच संपवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

याशिवाय, सोनम वांगचुक यांच्याबाबत भाजपची पूर्वीची भूमिका आणि नंतर बदललेली भूमिका यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं. लडाखला राज्याचा दर्जा, लोकसभा मतदारसंघांची मागणी आणि स्थानिकांच्या जमिनीवरील हक्कांसाठी वांगचुक यांनी आंदोलनं केली. मात्र, आश्वासनांनंतरही सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

Advertisement

त्यामुळे आता सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलं असून, त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Tags :

.