राज कपूर यांची जन्म शताब्दी
यानिमित्त १३ ते १५ डिसेंबरमध्ये राज कपूर यांचे फिल्म फेस्टीव्हल
या कार्यक्रमाला कपूर खानदान एकत्र
मुंबई
कपूर खानदानाने राज कपूर यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त खास १३ ते १५ डिसेंबर दरम्यान राज कपूर यांच्या सिनेमांचे फेस्टीव्हल चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांची उपस्थित होती.
शोमॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या फिल्म फेस्टीव्हल ला रेखाने पहिल्याच दिवशी उपस्थिती लावली. तर रेखा यांनी राज कपूर यांच्या पोस्टर समोर अश्रू पुसत हात जोडून वंदन केले.
या निमित्त कपूर फॅमिली नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्ली ला रवाना झाली होती. या भेटीचे काही क्षण सोशल मिडीयावर पाहल्या मिळाले. " श्री राज कपूर हे केवळ चित्रपट निर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर घेऊन जाणारे सांस्कृतिक दूत होते. चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांच्या पिढ्या त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतात. मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर्जनशील जगासाठी त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो." अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स (ट्विटर) वर शेअर केली आहे.