For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अलमट्टीची उंची वाढवणे कर्नाटकसाठी अशक्य

01:53 PM May 14, 2025 IST | Radhika Patil
अलमट्टीची उंची वाढवणे कर्नाटकसाठी अशक्य
Advertisement

सांगली :

Advertisement

अलमट्टी धरणाची उंची वाळवण्यासंदर्भात सध्या चर्चा दोन्ही राज्यात वर्षा सुरू आहे. परंतु कर्नाटकची आर्थिक स्थिती पाहता कर्नाटक सरकार या धरणाची उंची वाढवणे शक्य नाही असे स्पष्ट मत कृष्णा कुटुंब आणि जलबिरादरीचे ज्येष्ठ पदाधिकारी बेंगलोर येथील आप्पासाहेब येरनाळ आणि अथणीचे अण्णासाहेब अडाहळ्ळी यांनी मंगळवारी सांगलीत बोलताना व्यक्त केले.

तर प्रदुषणामुळे उगमापासून संगमापर्यंत कृष्णा नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. चला नदीला जाणूया अभियानाअंतर्गत कृष्णा कुटूंब परिवाराच्या वतीने अलमट्टी ते महाबळेश्वर कृष्णा नदीकाठ यात्रेचे मंगळवारी सांगलीत आगमन झाले.

Advertisement

दोन दिवसापूर्वी कर्नाटकातून जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चूध यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही यात्रा मंगळवारी सांगलीतून कराडला पोहोचली बुधवारी महाबळेश्वरमध्ये जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत या यात्रेची सांगता होणार आहे. मंगळवारी सांगलीत बसंतदादा स्मारकावर या यात्रेतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहिलेल्या मोजक्याच सांगलीकरांशी संवाव साधला प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी नदी प्रदुषण ही जागतिक समस्या बनली असून शालेय अभ्यासक्रमापासून जलजागृती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. उगमाजवळ झालेली वृक्षतोड, नदीपात्रातील अतिक्रमणे, बेसुमार वाळूउपसा, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, खत आणि केमिकल फॅक्टरी यांच्यातून प्रक्रिया न करतानाच मिसळले जाणारे सांडपाणी आदी कारणामुळे कृष्णा नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही, असे स्पष्ट मत आंध्रप्रदेशचे सत्यनारायण बोलीशेट्टी यांनी व्यक्त केले. नदी प्रदुषण रोखण्यासाठीच्या कायद्यांची कडक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदुषणामुळे कृष्णेचे पाणी सी आणि डी वर्गात गेल्याने ते पिण्यायोग्य राहिले नसल्याचे मत कर्नाटकच्या वाल्मीचे निवृत्त संचालक डॉ. राजेंद्र पोतदार यांनी मांडले.

उगमापासून विविध आघातामुळे कृष्णेचे अस्तित्व धोक्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. नर्मदा, डॉ. राजेंद्र कुंभार यांनीही मते मांडली, जलबिरादरीचे महाराष्ट्राचे अध्यश्न नरेंद्र चूध यांनी नद्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने व्यापक जलजागृतीची गरज असल्याचे मत मांडले. तर जलप्रदूषण आणि नद्यांच्या संवर्धनासाठी डायग्नोस्टिक अॅण्ड ट्रिटमेंट, शैक्षणिक संस्था संपर्क ग्रुप, लोकप्रतिनिधी संपर्क ग्रुप, तीर्थस्थान संपर्क ग्रुप, मिडीया आणि कायदा सल्लागार अशा विविध पातळ्यावर काम करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी व्ही. प्रकाशराव तेलंगणा, सुनिल रहाणे वर्धा, संपतराव पवार सांगली, डॉ. रवींद्र व्होरा, येरळा विकास संस्थेच्या डॉ. कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते आदी उपस्थित होते.

  • अलमट्टीचा सांगली, कोल्हापूरच्या महापुराशी संबंध नाही

अलमट्टी आणि हिप्परगा धरणावरील बरिष्ठ अधिकारी त्या धरणांच्या उभारणीपासून तेथेच कार्यरत आहेत. अलमट्टीचे बसवराज आणि हिप्परगा धरणावरील शिवकुमार यांच्याशी आपण चर्चा केली असता त्यांनी या धरणांतील पाण्याचा सांगली कोल्हापूरच्या महापुराशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. या संदर्भात सांगलीकरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी केव्हाही चर्चा करण्यास तयार असल्याचे आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी दिल्याचे चुघ यांनी सांगितले. तर कर्नाटक सरकारकडे भुसंपादनासाठी पैसे नाहीत. त्यामुळे कर्नाटक सरकार सध्या तरी अलमट्टीची उंची वाढवणे शक्य नसल्याचे अणासाहेब अड्डाहकळी आणि आप्पासाहेब येरनाळ यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.