For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

22 अपत्यांचे पालनपोषण नाही सोपे

06:26 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
22 अपत्यांचे पालनपोषण नाही सोपे
Advertisement

पोती भरून भाज्या खरेदी करते महिला

Advertisement

ब्रिटनमधील सर्वात मोठ्या परिवाराच आई सूए रेडफोर्ड पुन्हा चर्चेत आहे. सूए यांना 22 अपत्यं असून परिवार सातत्याने वाढत आहे. कारण मोठ्या मुली आता स्वत:च आई होत आहेत. 22 किड्स अँड काउंटिंग या शोच्या एपिसोडमध्ये सूए यांनी स्वत:च्या फूड शॉपिंगची झलक शेअर केली असून ती पाहून लोक चकित झाले आहेत. सूए यांच्या ट्रॉलीत सामानाचा ढिग होता. तर किलोच्या हिशेबाने भाज्या, मांस आणि फ्रोजन आयटम्स दिसून आले. शोच्या एका क्लिपमध्ये सूए स्थानिक आस्डा सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करताना दिसून आली. यावेळी आपण पूर्ण परिवारासाठी डिनरचे आयोजन करत आहोत. ज्यात मुली क्लोए, तिचा प्रियकर जेक आणि त्यांची 2 वर्षांची मुलगी मिलाही सामील असल्याचे ती सांगते. सूएच्या ट्रॉलीतील सामग्री पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सुएच्या ट्रॉलीत पिग्स अन ब्लँकेट्स, मग फ्रोजन सेक्शनमधून 60 यॉर्कशायर पुडिंग्ज, भाज्यांच्या सेक्शनमधून 3 किलो ब्रसेल्स स्प्राउट्स सामी झाले. यानंतर 4 किलो गाजर, 7.5 किलो बटाटे ट्रॉलीत ठेवण्यात आले. तसेच तिने दोन मोठे टर्कीही खरेदी केले. हे शॉपिंग पाहून चाहते अवाक् झाले.

Advertisement

सूए आणि तिचा पती नोएल रेडफोर्ड यांचा परिवार स्वत:चा बेकरी व्यवसाय आणि टीव्ही शोद्वारे कमाई करतो. ते कुठल्याही शासकीय लाभावर निर्भर राहत नाहीत. सूए यांचे जीवन नेहमी व्यग्र राहते. घरात बहुतांश मुले अद्याप त्यांच्यासोबत राहतात. परंतु मोठी मुले म्हणजेच क्रिस, सोफी आणि क्लोए वेगळ्या ठिकाणी राहतात. क्लोए आता स्वत:च आई झाली असून प्रियकरासोबत राहते. सूए अनेकदा स्वत:चा दिनक्रम शेअर करते. सकाळी उठून मुलांना शाळेत पाठविणे, घर सांभाळणे आणि शॉपिंग करण्यात तिचा पूर्ण वेळ संपतो. विकली ग्रॉसरी बिलच 400 पाउंडच्या आसपास असते. ज्यात दूध, ब्रेड, योगर्ट आणि मांसाचे मोठे प्रमाण सामील असते.

Advertisement
Tags :

.