पावसाळ्यात सापांपासून राहा सावधान !
कागल इम्रान मकानदार
पावसाळा सुरू झाला की मानवी वस्तीमध्ये सापाचे प्रमाण वाढते. यातूनच सापांना मारण्याच्या व सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱयाच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते, त्यामुळे ते सुरक्षित जागेच्या शोधात असतात, जून ते ऑगस्ट या काळात मानवी वस्तीच्या आसपास सप आढळतात. म्हणून या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता आपपालीन परिस्थितीची शास्त्राrय माहिती घ्यायला हवी.
पावसाळय़ात मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते. शेतामध्ये ही साप आढळतात. सर्पदंश झाल्यास प्रथमतः साप विषारी आहे की बिनविषारी, याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. विषारी सापाने चावा घेतल्यास चावलेल्या जागी दाताचे व्रण असतात. साप चावलेल्या वरच्या बाजूस घट्ट पट्टीने बांधावे. थेट जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे.
भारतात आढळणाऱया विषारी सापांच्या जातीपैकी केवळ चारच जाती विषारी आहेत. त्या म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे. घराच्या आसपास साप येऊ नये, यासाठी घराच्या भिंती व कुंपणाच्या भिंतींना पडलेली छिद्रे बुजवावीत. यांमध्ये उंदरासारखे प्राणी असल्याने त्यांच्या शिकारीसाठी साप येण्याची शक्यता असते.
विशेषतः साप गाडय़ांच्या आडोशात आढळतात. त्यामुळे गाडीत बसताना विशेष काळजी घ्यावी. बूट हेही सापांची आवडती जागा. साप येऊ नये म्हणून ग्रामीण भागात केस जाळणे, मंतरलेली वाळू, रॉकेल टाकणे हे पर्याय केले जातात. सापाची वास घ्यायची शक्ती खूप सशक्त असते, त्यामुळे उग्र वासामुळे ते कदाचित दूर जाऊ शकतात. सापाच्या शरीरावर खवले असतात त्यामुळे कुठलाही पदार्थ त्याच्या कातडीला लागल्यास त्याला तीव्र वेदना होतात.
अशी घ्या खबरदारी …
घराजवळ पालापाचोळा, कचऱयाचे ढिग, दगड-विटाचे ढिग, लाकडांचा साठा करुन ठेवू नये. घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. खिड़क्या-दरवाजांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत, याची दक्षता घ्या. सरपण, गोवऱया घरालगत न ठेवता काही अंतरावर पण जमिनीपासून उंचीवर ठेवा. गवतातून चालताना पायात बूट असावेत. अंधारातून जाताना बॅटरी सोबत बाळगावी. रात्री शक्यतो जमिनीवर झोपू नये. आपण आणि साप समोरासमोर आलो तर घाबरुन न जाता स्तब्ध उभे रहावे. शक्य असल्यास जवळची वस्तू सापाच्या बाजूला फेकावी साप त्याकड़े आकर्षित होतो आणि तेवढय़ाच वेळात आपण जाऊ शकतो.
साप घरात आल्यास काय कराल?
साप घरात आल्यास घाबरु नका, शांत रहा. त्याला न मारता आपल्या जवळील जाणकार सर्पमित्राला बोलवा.
सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर लक्ष ठेवा, लहान मुले पाळीव प्राणी यांना सापापासून दूर ठेवा. जेणे करून त्यांना अपाय होणार नाही.
सापाच्या जवळ जाण्याचा, फोटो काढण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. अश्यावेळेस साप चिडून तुमच्यावर हल्ला करू शकतो.
नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो. अशा सापापासून सावध राहावे.
आपल्या परिसरात साप आढळल्यास त्याला न मारता वरील खबरदारी घ्यावी.