महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तराखंड, दिल्लीत पावसाचा जोर वाढला

09:50 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भूस्खलन दुर्घटनांमुळे जनजीवन विस्कळीत : सखल भागांमध्ये साचले पाणी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

मान्सूनचे आगमन होताच उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. उत्तराखंड आणि दिल्लीसह आजुबाजुच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाला सुऊवात झाल्यापासूनच उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे काही रस्ते ठप्प झाले आहेत. तसेच सखल भागात पाणी साचले आहे. नद्या, नाले तुंबले आहेत. पावसामुळे उत्तराखंडच्या चारधाम यात्रेवरही परिणाम झाला आहे.

जोशीमठच्या पांगनो गावात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूस्खलनामुळे 6 घरे कोसळली आहेत.  गतवषीही या गावात वारंवार दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी प्रशासन व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे, बागेश्वरमध्येही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गऊड तालुक्मयात मुसळधार पावसामुळे गऊड गंगा नदीला पूर आला आहे. सरयू-गोमती नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ढिगाऱ्यांमुळे जिह्यातील 15 रस्ते बंद आहेत. जेसीबी मशिनच्या सहाय्याने रस्ते मोकळे केले जात आहेत.

चारधाम यात्रेवर परिणाम

मान्सूनच्या पावसानंतर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेवरही परिणाम झाला आहे. बद्रीनाथ धामच्या यात्रेतही सातत्याने व्यत्यय येत आहे. हेमकुंड साहिब येथे प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये पर्यटकांची संख्या कमी होत आहे.

दिल्लीतही मुसळधार पाऊस

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील अनेक भागात गुऊवारी सकाळी आणि दुपारच्या सुमारास पाऊस झाल्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे दिल्लीतील विविध भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. गुऊवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत दिल्लीत सफदरजंगमध्ये 9.2 मिमी, लोधी रोडमध्ये 7.4 मिमी, रिजमध्ये 5.6 मिमी, पालममध्ये 17.4 मिमी आणि आयानगरमध्ये 40.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. पावसामुळे किमान तापमान 24.8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article