Paleshwar Dam | शाहूवाडीतील पालेश्वर धबधबा पर्यटकांनी फुलला; सुट्टीचा मनमुराद आनंद
शाहूवाडी -शाहूवाडी तालुक्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी त्याचबरोबर विविध धबधब्यावर मनमुराद आनंद घेण्यासाठी विविध भागातून पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे .
याच माध्यमातून पालेश्वर धरणाजवळ असलेल्या धबधब्यावर रविवारी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली होती .पावसाने विश्रांती दिल्याने पर्यटकांनी सुटीचा आनंद लुटला .

पावसाळ्याच्या दिवसात शाहूवाडी तालुक्यातील पर्यटनावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते .बर्की , मानोली, पालेश्वर, केर्ली , आदी धबधब्यावर पर्यटकांची नेहमीच गर्दी वाढत असते

रविवारी सुट्टीच्या दिवशी पालेश्वर धरणा नजीक असलेल्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी चांगलीच झाली होती . उघडलेला पाऊस आणि सुट्टीचा दिवस यामुळे पर्यटकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसत होतं . लहान चिमुकल्यास वृद्ध नागरिक देखील या ठिकाणी या धबधब्या चा आनंद लुटण्यासाठी सहभागी झाले होते .