For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात थंडीसोबतच पर्जन्यधारा

07:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्य प्रदेश  उत्तर प्रदेशात थंडीसोबतच पर्जन्यधारा
Advertisement

राजस्थानच्या सीकरमध्ये पारा 1 अंशांपर्यंत घसरला; बऱ्याच राज्यांमध्ये दाट धुके

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू असतानाच गुऊवारी सकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. दुसरीकडे, कर्नाटकातील काही किनारी भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांत 5.5 मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 5.4 मिमी अधिक आहे. पावसामुळे या भागातील तापमानात घट झाली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसह 15 राज्यांमध्ये गुऊवारी दिवसाची सुऊवात धुक्मयाने झाली. भोपाळ आणि जयपूरसह उत्तर आणि मध्य भारतातील 22 शहरांमध्ये दृश्यमानता 200 मीटरपेक्षा कमी राहिल्यामुळे दिल्लीला पोहोचणाऱ्या 26 रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये तापमान 4.3 अंशांवर पोहोचले आहे. याचदरम्यान सकाळच्या सत्रात बऱ्याच भागात पर्जन्यधारा कोसळल्याची नोंद झाली आहे. राजस्थानमधील सीकरमध्ये पारा 1 अंशावर पोहोचला आहे. माउंट अबूमध्येही तापमान शून्याच्या आसपास आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानच्या काही भागात थंडीचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमधील शाळांना 6 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

धुक्याची स्थिती कायम राहणार

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासात उत्तर भारतातील राज्यांमधील किमान तापमानात दोन अंशांनी घट होऊ शकते. थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढण्याची शक्मयता आहे. 5 जानेवारी रोजी सकाळी काही तास जम्मू-काश्मीर-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि विविध भागात दाट धुके राहण्याची शक्मयता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, सिक्कीम, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील दोन दिवस धुक्मयाची स्थिती कायम राहील.

दक्षिणेकडील राज्यात पावसाची शक्यता

अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात येत्या 3 ते 4 दिवसात पावसाची शक्मयता आहे. मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये हलका पाऊस पडू शकतो. 5 जानेवारी रोजी पूर्व मध्य प्रदेशात हलक्मया पावसाची शक्मयता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 5 जानेवारीला ढगाळ वातावरण राहील.

Advertisement
Tags :

.