Kolhapur Rain | कोल्हापूर अलर्ट! 21 बंधारे जलमय, पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढू लागला आहे. ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण ४७६.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी गगनबावडा, शाहूवाडी आणि पन्हाळा या घाटमाथ्यावरील तालुक्यांमध्ये मात्र अतिवृष्टी झाली. यामुळे धरणात आणि नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर शनिवारी रात्री ९ वा. २६ फूट इतकी पाणी पातळी होती. इशारा पातळी ३९ तर धोका पातळी ४३ फूट आहे. घटप्रभा धरण आणि फाटकवाडी मध्यम प्रकल्प भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मागील २४ तासांत पावसाची संततधार कायम राहिल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यात सरासरी ४९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली गेले असून बंधाऱ्यातून १९,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या पाणीपातळी इशारा पातळीपासून बरीचपंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर रात्री २६ फूट पातळीखाली असली तरीही नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रात्री ९ वा. राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी २५ फूट इतकी नोंदविण्यात आली. बंधाऱ्यातून १९,०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नदीची इशारा पातळी ३९ फूट, तर धोका पातळी ४३ फूट असल्याने सध्या पाणीपातळी इशारा पातळीपासून बरीच खाली आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.नद्या दुथडी भरून वाहू लागल्या मागील चार दिवसांपासून धरणक्षेत्रात शनिवारी पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे जिल्हयातील धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ होत आहे. घटप्रभा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर फाटकवाडी मध्यम भरुन सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत कोरड्या पडलेल्या नद्या चार दिवसांच्या पावसाने दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पंचगंगा नदीच्या पात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
२१ बंधारे पाण्याखाली वाहतुकीवर परिणाम
जिल्ह्यातील २१ बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या भागातील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाजव्यक्त केल्याने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
पुढील तीन दिवस मुसळधार
हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील पाऊस (मि.मी.)
जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०२ मि.मी. पाऊस झाला असून पन्हाळा येथे ५४.३, शाहूवाडी ७९.७, राधानगरी ६६.४, आजरा ६२, करवीर ५२.५, कागल ४५.३, गडहिंग्लज ४१.६, भुदरगड ४६.४, चंदगड ४४.३, शिरोळ १८.४ आणि हातकणंगलेत २९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.