For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपाच्या कार्यालय आवारातच पावसाचे पाणी साचून

11:01 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपाच्या कार्यालय आवारातच पावसाचे पाणी साचून
Advertisement

अधिकारी लक्ष देणार का? पेव्हर्सवर साचला मातीचा गाळ

Advertisement

बेळगाव : वळिवाच्या दमदार पावसाने स्मार्ट सिटीचा दर्जा उघडा पाडला आहे. याबद्दल संपूर्ण शहरातून टिकेची झोड उठली आहे. शहरात ही अवस्था असून शहराची देखभाल करणाऱ्या महानगरपालिकेच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच पाणी साचून राहिल्याने याबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे. महानगरपालिकेची इमारत अलिकडेच काही वर्षांपूर्वी बांधली गेली आहे. महानगरपालिकेच्या आवारामध्ये पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. मात्र हे बसविताना पाण्याचा निचरा होईल, याची काळजीच घेतली नाही. प्रवेशद्वाराला लागूनच डाव्या बाजूला वाहने पार्किंग करणे, तसेच ये-जा करण्यासाठी लहान रस्ता आहे. त्या रस्त्यावर पेव्हर्स बसविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे. याचबरोबर त्या पेव्हर्सवर मातीचा गाळ साचून राहिला आहे. त्यामुळे वाहनेदेखील घसरत आहेत. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय आवारातच दुरवस्था झाली आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. पाणी साचल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर तेथून ये-जा करताना पाय घसरून पडण्याचीही शक्यता आहे. तेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी दुरुस्ती करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.