For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चोवीस तासात पाऊस बनला आक्रमक

08:11 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
चोवीस तासात पाऊस बनला आक्रमक
Advertisement

राज्यात एकूण पावसाची नोंद 57 इंच : तूट आली 31 टक्क्यांपर्यंत खाली

Advertisement

त. भा. विशेष प्रतिनिधी

पणजी : वाळपईमध्ये पडलेल्या साडेपाच इंच पावसामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण आता वाढले आहे. गेल्या दोन दिवसात सत्तरी व साखळी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात गेल्या 24 तासांमध्ये पावणेदोन इंच पावसाची नोंद झाली. मोसमातील एकूण पावसाची नोंद आता 57 इंच झाली आहे. यामुळे मोसमातील पावसाची तूट कमी होऊन 31 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करून हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

गेल्या 24 तासांमध्ये पाऊस बराच आक्रमक झाल्याचे दिसून आले. अनेक भागांमध्ये रात्रभर पाऊस पडला. पणजीमध्ये रात्री उशिरापर्यंत पाऊस चालू होता परंतु त्याचे प्रमाण फारच कमी होते. वाळपईध्ये मात्र मुसळधार पाऊस पडला. सर्वाधिक पावसाची नोंद त्या ठिकाणी झाली असून तिथे साडेपाच इंच पाऊस पडला. साखळीमध्ये पावणेतीन इंच पावसाची नोंद झाली. धारबांदोडा, केपे, सांगे या ठिकाणी दोन इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. फोंडा येथे पावणे दोन इंच, जुने गोवे येथे दीड इंच, म्हापसा येथे सव्वा इंच, मडगाव, मुरगाव, दाबोळी, पणजी येथे प्रत्येकी एक इंच पाऊस झाला. काणकोण येथे अर्धा इंच, पेडणेमध्ये अर्धा सेंटीमीटर पावसाची नोंद झाली.

गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे पाऊस 57 इंचापर्यंत पोहोचला. पुढील 48 तासांत गोव्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. मंगळवारी दिवसभरात पणजी व आसपासच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी पडून गेल्या. कर्नाटकामध्ये किंचित कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून त्यामुळे गोव्यातही जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.

 तीन धरणे भरली, उर्वरित लवकरच भरणार

गोव्यातील जवळपास सर्वच धरणे आता भरली आहेत. साळावली, पंचवाडी, गावणे ही तीन धरणे या अगोदरच पूर्ण भरुन वाहू लागली आहेत. आमठाणेमध्ये आता 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. गोव्यातील सर्वात उंच धरण असलेल्या अंजुणे धरणात 87.55 मीटर एवढे पाणी असून त्याची एकूण क्षमता 93.20 मीटर एवढी आहे. सध्या धरणामध्ये असलेले पाणी 70.9 टक्के एवढे आहे. अंजुणे धरण क्षेत्रामध्ये 93 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. गोव्यातील हा सर्वाधिक पाऊस ठरतो. सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता कदाचित पुढील आठवड्यामध्ये  अंजुणे धरण पूर्ण क्षमतेने भरून जाऊ शकते.

अंजुणे धरण 90 मीटरच्या दिशेने...

डिचोली प्रतिनिधी

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने डिचोली तालुका तसेच उत्तर गोव्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या केरी सत्तरी येथील अंजुणे धरण आवश्यक पाणीपातळी गाठणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतु धरणातील वाढणाऱ्या पाणीपातळीने सर्वांनाच खुश केले आहे. हे धरण भरू लागले असून धरणाने 90 मीटरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एकूण 93.20 मीटर पाणीपातळी असलेल्या या धरणाची सध्या 87.55 मीटर इतकी पातळी झाली आहे. त्यामुळे लवकरच या धरणाची पातळी 90 मीटरवर जाणार आहे.

यावर्षी पावसाला उशिराने सुरू झाला असला तरी पावसाचे प्रमाण हे समाधानकारक आहे. सध्या धरणक्षेत्रात 92 इंच इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे सध्या हे धरण 70 टक्के भरले आहे. चोर्ला घाटात पडणाऱ्या पावसामुळे सर्व जलस्रोत प्रवाहित झालेले आहेत. त्यामुळे धरणात पाण्याचा प्रवाह सुरूच आहे.

या धरणात एकूण 4483 हेक्टर मीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. सध्या धरणात 3179 हेक्टर मीटर इतका पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात व चोर्ला घाटात पावसाचा मारा सुरू असल्याने येणाऱ्या काळात धरणाची पातळी 90 मीटरवर पोहोचणार आहे. 90 मीटरवर पाण्याची पातळी गेल्यानंतर पावसाचा भविष्यातील अंदाज लक्षात घेऊन अतिरिक्त पाणी समोरील वाळवंटी नदीत सोडण्यात येणार

Advertisement
Tags :

.