कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यासह पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

05:57 PM Jul 24, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली :

Advertisement

जिल्ह्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी पावसाने विश्रांती घेतली. कोयना धरणातून ११४०० क्युसेस तर वारणा धरणातून ४४०० क्युसेस विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात चोवीस तासात २ मिमी पावसाची नोंद झाली. वारणा धरणात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २७.८० टी.एम.सी. पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम. सी. आहे.

Advertisement

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे कोयना ७६.३८ (१०५.२५), धोम १०.९० (१३.५०), कन्हेर ८.१४ (१०.१०), धोम बलकवडी २.८७(४.०८), उरमोडी ७.७३ (९.९७), तारळी ४.९२ (५.८५), वारणा २७.८० (३४.४०), राधानगरी ७.७९ (८.३६), दूधगंगा १९.०३ (२५.४०), तुळशी २.७५ (३.४७), कासारी २.०८ (२.७७), पाटगांव ३.५९ (३.७२), अलमट्टी ९८.७३ (१२३).

विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेसमध्ये पुढीलप्रमाणे : कोयना धरणातून ११४००, कण्हेर ३४०, तारळी ९३, वारणा ४४००, राधानगरी १५००, दुधगंगा १६००, तुळशी १००, कासारी ३००, पाटगाव ३००, हिप्परगी बॅरेज ४२ हजार ९१० व अलमट्टी धरणातून २५ हजार क्युसेस विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फुटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली १३ (४०) व अंकली पूल हरिपूर १०.६ (४५.११).

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ०.७(१७९.४), जत४.३ (१५६.७), खानापूर-विटा २.५ (१२८.६), वाळवा-इस्लामपूर०.६ (२९१.५), तासग्-गाव २.९ (१६२.३), शिराळा ३.४ (७१६), आटपाडी २.२ (१६१.७), कवठेमहांकाळ २.८ (१४५.४), पलूस ०.३ (२५१.४), कडेगाव १.५ (१८३.९).

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article