For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

12:21 PM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
Advertisement

वादळी वाऱ्यामुळे झाडे, वीज खांब कोसळले : सत्तरी, डिचोली, बार्देशमध्ये अधिक फटका

Advertisement

पणजी : परतीच्या पावसाने काल सोमवारी सायंकाळी धुमाकूळ घातला. सत्तरीपासून सुऊ झालेला हा मुसळधार पाऊस सायंकाळी उशिरा पणजीत दाखल झाला. राज्यभर मुसळधार पाऊस पडला आणि त्याचबरोबर आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक वीजखांब तुटून पडले, परिणामी सत्तरी व डिचोली तसेच फोंडा तालुक्यातील अनेक भागातील वीजपुरवठा ठप्प झाला. आजही जोरदार पाऊस पडणार आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक वाहनांचे व घरांचेही नुकसान झाले. ऐन पावसाळ्यात पडला नाही एवढा मोठा पाऊस काल सोमवारी सायंकाळी पडला.

अनेक ठिकाणी या मुसळधार पावसाबरोबरच गाराही पडल्या. सकाळपासून सर्वत्र चांगले स्वच्छ उन पडले होते. सायंकाळी 4 नंतर हळूहळू ढगाळ वातावरण सुऊ झाले. सत्तरीत त्याचबरोबर फोंडा, सांगे तालुक्यातील काही भागात जोरदार गडगडाटासह मुसळधार पाऊस सुऊ झाला. नंतर हळूहळू हा पाऊस पश्चिम दिशेने सरकत गेला आणि सायंकाळी 6.30 वा.च्या दरम्यान पणजीत पोहोचला. पावसाचा जोर एवढा होता की तासाभरात पणजीतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आणि अनेक वाहनचालकांना वाहने पार्क कऊन बाजूला राहावे लागले. कारचालकांना समोरचे काही दिसत नव्हते.

Advertisement

या आकस्मिक मुसळधार पावसाने सोमवारी सायंकाळी संपूर्ण गोव्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक झाडे पडल्याने गोव्याच्या विविध भागातून अग्निशामक दलाला वारंवार फोन येऊ लागले. कळंगुट येथे मायकल लोबो यांच्या कार्यालयासमोर झाड तुटून पडले. डिचोलीत अनेक भागात झाडाच्या फांद्या तुटून वीज खांबांवर पडल्या. ताळगाव, सांगे येथे माड कोसळले. हळदोणा येथेही भगवती मंदिरासमोर वीज खांबावर आंब्याचे झाड पडले. परिणामी तेथील वीज पुरवठा पूर्णत: खंडित झाला. सोमवारी सायंकाळी उत्तर गोव्यातील सत्तरी, डिचोली व बार्देशमधील काही भाग हे पूर्णत: अंधारात राहिले. वीज कर्मचारी रात्री उशिरापर्यंत वीज दुऊस्तीचे काम करीत होते.

Advertisement
Tags :

.