For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्यापासून उत्तर कर्नाटकात तीन दिवस पाऊस

06:45 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
उद्यापासून उत्तर कर्नाटकात तीन दिवस पाऊस
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेंगळूर :

राज्यात काही भागात मान्सूनचा जोर वाढला असून, पुढील सात दिवसांत किनारपट्टी, मलनाड आणि उत्तर कर्नाटक भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस शक्यता आहे. रविवारपासून तीन दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचे अनुमान आहे. 29 जून ते 1 जुलै दरम्यान मंगळूर, उडुपी आणि कारवार या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून, लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

दक्षिण कर्नाटक भागातील शिमोगा, चिक्कमंगळूर आणि कोडगू जिल्ह्यांमध्ये 29, 30 जून आणि 1 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, हासन आणि दावणगेरे जिल्ह्यांमध्येही 29 आणि 30 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर कर्नाटक भागातील बेळगाव, धारवाड आणि हावेरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये 29 जून ते 1 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30 जून रोजी बिदर, कलबुर्गी आणि यादगिरी जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 कि. मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मध्यम ते तुरळक पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बेंगळूर शहरात पुढील 24 ते 48 तासांत सर्वसाधारणपणे ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी ताशी 30 ते 40 कि. मी. वेगाने वारे वाहणार असून तुरळक पाऊस पडेल.

Advertisement
Tags :

.