For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुबईत पावसाने मोडला 75 वर्षांचा विक्रम

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुबईत पावसाने मोडला 75 वर्षांचा विक्रम
Advertisement

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये 135 लोकांचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था /इस्लामाबाद, दुबई

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अनेक आखाती देशांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पाऊस पडत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. दुबईसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये पावसाने 75 वर्षांचा विक्रम मोडला आहे. दुबईतील पूरसदृश परिस्थिती पाहता तेथे उपस्थित असलेल्या भारतीय वाणिज्य दुतावासाने हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. त्याचवेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 135 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अफगाणिस्तानमध्ये 70 आणि पाकिस्तानमध्ये 65 जणांचा मृत्यू झाला आहे. ओमानमध्येही पुरामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दुबईमध्ये गेल्या 24 तासात सुमारे 15.2 सेंटीमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी येथे 10 इंचाहून अधिक पाऊस झाला. बुधवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ये-जा करणारी 300 उ•ाणे रद्द करण्यात आली. दुबईतील खराब हवामानामुळे भारतात येणारी 28 उ•ाणे रद्द करण्यात आली होती. तसेच पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात आणीबाणी लागू करावी लागली. ओमानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मस्कतसह देशातील अनेक भागात परिस्थिती बिकट आहे. पावसामुळे आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बसमध्ये प्रवास करणाऱ्या 10 शाळकरी मुलांचाही समावेश आहे. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात बस वाहून गेली. मुसळधार पावसामुळे कझाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागातून 1.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.