For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बँकॉकमध्ये सलग 48 तास पाऊस

06:31 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
बँकॉकमध्ये सलग 48 तास पाऊस
Advertisement

50 जिल्ह्यांमध्ये आणीबाणी लागू : पंतप्रधान तातडीने लंडन येथून परतले

Advertisement

वृत्तसंस्था, बँकॉक

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सलग 48 तासापर्यंत सातत्याने अतिवृष्टी झाल्यावर अधिकाऱ्यांनी पूर्ण शहरात पूरसंकट घोषित केले आहे. घरे, दुकाने, रस्त्यांवर पाणी भरल्यावर ही घोषणा करण्यात आली. बँकॉकमध्ये गुरुवार दुपारपासून आतापर्यंत 300 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नेंद झाली आहे. या आपत्तीमुळे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांना स्वत:चा लंडन दौरा अर्धवट सोडत मायदेशी परतावे लागले आहे. तर बँकॉक मेट्रोपॉलिटन प्रशासनाने शहराच्या सर्व 50 जिल्ह्यांमध्ये आपत्ती घोषित पेली आहे.

Advertisement

आपत्ती घोषित करण्यात आल्याने वेगाने मदत अन् बचावकार्य राबविण्याचा  विशेष अधिकार स्थानिक संघटनांना प्राप्त झाला आहे. स्थिती आता स्थिर झाली आहे, पुढील काळात पाऊस न पडल्यास समस्या दूर होऊ शकते. पाऊस थांबल्यास पूराचे पाणी ओसरण्यास दोन ते तीन दिवस लागू शकतात असे गव्हर्नर चाडचार्ट सित्तीपुंत यांनी सांगितले.

 

पावसाने शहराच्या कालव्यांच्या जाळ्याला भरले असून अस्वच्छ पाणी आसपासची घरे, रेस्टॉरंट, दुकाने आणि गल्ल्यांमध्ये शिरले आहे. बँकॉकला कधीकाळी पूर्वेचे व्हेनिस म्हटले जात होते, कारण हे शहर दलदलयुक्त भागावर वसलेले असून समुद्रसपाटीपासून केवळ 1.5 मीटर उंचीवर आहे. शहरातील कालवे पाणी बाहेर काढण्याचे मुख्य स्रोत आहेत, परंतु ते भरून गेल्यास पाणी चहुबाजूला फैलावते. समस्या कालवे भरण्याची आहे, आसपासच्या प्रांतांसोबत मिळून पाण्याला इतर दिशांमधून वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करत आहोत असे गव्हर्नर चाडचार्ट यांनी सांगितले.

शाळा बंद राहणार

शहराचे पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एकूण प्रति सेकंद 1200 घनमीटर पाणी बाहेर काढले जातेय. वाळूची एक लाख पोती तयार ठेवण्यात आली आहेत. पूरामुळे पूर्व बँकॉकच्या अनेक भागांमध्ये कंबरेइतके पाणी भरले आहे. पूरग्रस्त लोकांसाठी 233 अस्थायी मदतशिबिरे निर्माण करण्यात आली असून यात सुमारे 4200 लोक राहत आहेत. सोमवारी शाळा बंद राहणार असून काही अधिकाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगण्यात आले आहे.

 

सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस

बँकॉकच्या प्रशासनानुसार एक ते 25 सप्टेंबरपर्यंत 487 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर 1991-2020 दरम्यान या कालावधीत सरासरी 269 मीटर पाऊस पडत होता. यंदा सप्टेंबरमध्ये बँकॉकमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अधिकाऱ्यांनी पूराचे पाणी बाहेर काढण्यास पूर्ण जोर लावला आहे. पंपिंग स्टेशनच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यात येत असून आसपासच्या प्रांतांचे सहकार्य घेतले जातेय. अस्थायी मदतशिबिरे सुरू करण्यात आली असून संकटग्रस्त क्षेत्रांमध्ये मदतकार्याला वेग देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.