For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Rain Update | कोल्हापूरला पावसाचा तडाखा! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

10:57 AM Jul 21, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur rain update   कोल्हापूरला पावसाचा तडाखा  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Advertisement

कोल्हापूर - गेले दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. या दमदार पावसाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत, विशेषतः धरण क्षेत्रांत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यासह कोल्हापुरात पावसाने जोरदार हजेरी लावली... त्यामुळे कोल्हापुरची जीवनवाहीनी मानली जाणारी पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे.

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या 28 फूट 8 इंचांवर पोहोचली असून जिल्ह्यातील तब्बल 19 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात 76 टक्के तर काळम्मावाडी धरणात 42 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शहरात पावसाची उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात रिमझिम पाऊस कायम आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.