वरूणराजा थोडं थांब! पेरणीची कामं खोळंबली
बुध :
गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तोच आता शेतकऱ्यांच्या अडचणीचे कारण ठरत आहे. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं असून, माती ओलसर व चिखलयुक्त झाल्यामुळे पेरणीसाठी आवश्यक असणारी जमीन तयार होत नाही.
खरीप हंगामाची सुरुवात झाली असली, तरी अनेक शेतकरी अजूनही पेरणीची वाट पाहत आहेत. काहींनी आधीच बी-बियाणे व खते विकत घेतली आहेत, परंतु शेतात उतरता येत नाही, यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
खटाव तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सुरुवातीला पावसामुळे शेतकरी खुश झाला तरी आता पाऊस काय थांबायचं नाही घेत नाही. शेतातील पेरणीची कामे आतापर्यंत पूर्ण झाली पाहिजे होती. परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर जात आहे. थोडे दिवस वरूणराजाने थांबावे, अशी शेतकऱ्यांकडून विंनती करण्यात येत आहे. सतत पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये ट्रॅक्टर जात नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून वरूणराजा तू थोडं थांब अशी विनंती करण्यात येत आहे. जर हा पाऊस अजून थोडे दिवस राहिला तर शेतकरी वर्ग अडचणी देऊ शकतो. अगोदरच आले, कांदा पिकाने शेतकऱ्याची साथ सोडली आहे. कडधान्याची पेरणी करून शेतकऱ्याला थोडा धीर भेटू शकतो. परंतु पाऊस काय थांबत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला अडथळे निर्माण होत आहे. चार-पाच दिवस पाऊस पूर्ण थांबला तर शेतकऱ्यांना पेरणी करता येऊ शकते. काळ्या मातीच्या रानांना अजूनही जास्त दिवस लागतील. पावसाचा दिनक्रम काही लक्षातच येईना. सकाळी ऊन दुपारी पाऊस या वातावरणातील बदलामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे अडचणीत आला आहे. त्यामुळे पावसाने थोडा विश्रांती घ्यावी, अशी शेतकरी वर्गाकडून साकडे घालण्यात येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवसांमध्ये आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतात पाणी साचलेली स्थिती लवकर सुधारण्याची शक्यता कमी आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून, पेरणीस योग्य वेळ व स्थिती आल्यावरच काम सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.
- आले व कांद्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत
गेल्या चार वर्षातील सर्वात कमी बाजार यावर्षी आले पिकाला आहेत. आले पिकाची एक गाडी सात हजार ते आठ हजार रुपये या दरात आता सध्या चालू आहे. या आल्याच्या निचांकी दरामुळे शेतकरी शेतात घातलेले भांडवल सुद्धा काढू शकत नाही. पावसाला यावर्षी लवकर सुरुवात झाल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कांदा पीक आहे. तसेच शेतात सोडून दिले आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये भुय एरण केल्या होत्या. त्या पावसामुळे पूर्णपणे नासून गेल्या आहेत. त्यामुळे आले आणि कांदा पिकाने शेतकऱ्यांना या अगोदरच नुकसान दिले आहे. तरी वरूणराजाने थोडे थांबावे व शेतकऱ्यांना पेरणी करून द्यावे, अशी शेतकऱ्यांकडून देवाला साकडे घालण्यात येत आहे.
- सत्यम मोहन जाधव (प्रगतशील शेतकरी)