For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | सार्वजनिक बांधकाम खात्याचा ढिसाळ कारभार; वसगडे बसस्टँड चौकात साचले पाणी, ग्रामस्थांचा तीव्र संताप

01:15 PM Jun 10, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सार्वजनिक बांधकाम खात्याचा ढिसाळ कारभार  वसगडे बसस्टँड चौकात साचले पाणी  ग्रामस्थांचा तीव्र संताप
Advertisement

Advertisement

भिलवडी : गेल्या दोन दिवसात कृष्णा काठावर जोरदार पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे अनेक रस्त्यावरती पाणीच पाणी साचले, उपसाबंदीमुळे अनेक शेतकरी पाण्याविना अडचणीत सापडले होते. परंतुया पावसाने त्यांना दिलासा मिळाला, तर वसगडे येथील मुख्य बसस्टॅन्ड समोरील चौकात मात्र पावसामुळे गेली दोन ते तीन दिवस झालेपाणी साचून राहिल्यामुळे वाहनधारकांसह चालत जाणाऱ्या महिलाआणि ग्रामस्थांना तारेवरची कसरत करत जावे लागत आहे

सार्वजनिक बांधकामखात्याच्या ढिसाळ कारभारामुळे या मुख्य चौकात खोलगट असे खड्डेच खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या बाबीकडे संबंधित बांधकाम विभाग सोईने दुर्लक्ष करीत
असल्याने ग्रामस्थांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर स्थानिक राजकीय नेत्यांनीही या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ स्थानिक नेत्यांच्यावरती नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

Advertisement

वसगडे गावाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक फार मोठा वारसा आहे. या गावात काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष तुल्यबळ असून या दोन्ही पक्षातील नेते कार्यक्षम असून सुद्धा या गावातील अनेक समस्या निकाली लागल्या गेल्या नसल्याने स्थानिक पातळीवरील ग्रामस्थ या नेत्यांवरती नाराजी व्यक्त करीत आहेत.

तर वसगडे येथील बस स्टॅन्ड समोरील मेनरोड लगात पडलेले खड्डे व रस्त्याची झालेली दैनिय अवस्था पाहता मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना या खड्ड्यातून वाट काढत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दोन दिवस झाले पावसाने या भागात पाणी साचल्याने या खड्यामध्ये पाणी साचून राहिले आहे. पाण्यातून वाट काढत जाण्यासाठी महिला आणि ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेले दोन वर्षे झाली या रस्त्याचे काम संत गतीने सुरू असून काही भागात रस्ता पूर्ण झाला आहे तर काही भागात तो अपूर्ण राहिलेला आहे.

यामुळे बांधकाम खात्याच्या दुर्लक्षाने या रस्त्याचे काम काही ठिकाणी रखडलेले दिसत आहे. या बस स्टॅन्ड समोरील खड्ड्यात एखाद्या वाहन धारकाचा बळी गेल्यानंतरच किंवा अपघात घडल्या नंतरच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का?, अशा तीव्र संताप जनक प्रतिक्रिया या भागातील ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.

गेली दोन वर्षे झाले हा बांधकाम विभागाच्या रस्ता कामचुकारपणामुळे काम चालू बंद, अशा अवस्थेत असून मुख्य बस स्टॅन्ड समोरील सुमारे ५० मीटर इतका रस्ता खचला असून त्या रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडल्याने यामध्ये पाणी साचून डबक्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून वेळेत हा रस्ता दुरुस्त व खड्डे भरून न घेतल्यास एखादा मोठा अपघात किंवा एकाचा प्राण जाण्याची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.