पावसाने सात वर्षात मोडले रेकॉर्ड
सातारा :
अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यात मे महिन्यात सुरु केली. त्या पाठोपाठ लागूनन मान्सून सुरु झाला. पावसाने जिल्ह्यातील अकराही तालुक्यात दमदार बंटींग केली. जून महिना संपला तरीही पाऊस थांबेना अशी परिस्थिती आहे. जुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी दि. ३० रोजीही सकाळपासूनच सातारा शहरात सरीवर सरी सुरु होत्या, सुरु असलेल्या पावसामुळे मागने रेकॉर्ड मोडून ३० जुनपर्यतचा पाऊस १२५.७ टक्के पाऊस झाला आहे. अजूनही जुलै महिना असून त्या जुलै महिन्यातले २२ ते २५ जुलै हे दिवस पावसाचे आठवले की जिल्हावासियांच्या अंगावर काटा उभा रहातो. दरम्यान, गतवर्षी १४ टक्के कोयनाधरण भरले होते. या वर्षी ५० टक्केच्या जवळपास भरत आले आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण ११० टक्के जाहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. परंतु अवकाळी पावसाच्या पाठोपाठ जोडून मान्सूनची एन्ट्री झाली. मान्सूनचा पाऊस सुद्धा काही केल्या थांबता थांबेना अशी परिस्थिती झाली आहे. जरा उघडला की लगेच काही वेळात रपारपा पडून पाणी पाणी करून निघून जात आहे. पश्चिम भागातल्या धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण ज्यादा झाले आहे.
जुन महिन्याच्या ३० तारखेला पावसाने मागनी रेकॉर्ड मोडीत काढली आहेत. दि. ३० रोजीही सकाळपासूनच सरीवर सरी सुरु होत्या. सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील गरणे सुद्धा जुलै महिन्याऐवजी ३० जुनलाच भरु लागली आहेत. अजूनही पावसाचा जुलै महिना उरला आहे. त्यामुळे पावसाने रेकॉर्ड ब्रेक काम सुरु असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. धरण परिसरातही पावसाबी रिपरिप सुरु आहे.
- दि. ३० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर झालेली आकडेवारी.
तालुका आज आजपर्यंतचा
सातारा १२.३ २२६.८
जावली २८.४ ५१२.२
पाटण २१ ३५६.४
कराड ८,१ २१५.१
कोरेगाव ७.३ १७३.३
खटाव ५.६ १३६.७
माण ३.५ ८६
फलटण ०.५ ९०.७
खंडाळा ३ १५२.८
बाई ५.८ २६०.७
महाबळेश्वर ५९.४ ८६२.१
जिल्हा ११.८ २४३.९
- धरणांचा पाणी साठा टीएमसीमध्ये
धरण पाणी पातळी आज टक्केवारी आज गतवर्षीचा पाणी टक्केवारी गतवर्षी
कोयना ५२.०८ ४९.४८ १४.४२ १४,४
थोम ८.०५ ५९.६३ २.७५ २३.५२
कण्हेर ६,८ ६७.३३ १.४४ १५.०२
उरमोडी ७.२२ ७२.४९ ०.६१ ६.३२
तारळी ३.७४ ६३.९३ १.२२ २०.८९
------------------------------------------------------------
वर्ष सरासरी पाऊस टक्केवारी
२०१९ १६३.८ ८४.४
२०२० १८१,६ ९३.६
२०२१ २६४.६ १३६.३
२०२२ ७८.६ ४०.५
२०२३ ८६.१ ४४.४
२०२४ २३८.२ १२२.७
२०२५ २४३.९ १२५.७