महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेल्वे दोन वर्षात 10 हजार कोच बनवणार

10:48 PM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : प्रतीक्षा यादीपासून दिलासा मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने मोठी खुशखबर दिली आहे. भारतीय रेल्वे पुढील दोन वर्षांत 10,000 नॉन-एसी कोच बनवणार आहे. या निर्मितीमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो लोकांच्या प्रतीक्षा यादीची संख्या काही प्रमाणात कमी होणार आहे. 2024-25 मध्ये 4,485 डबे आणि 2025-26 मध्ये 5,444 डबे तयार केले जातील, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका निवेदनाद्वारे दिली. यातील बहुतेक डबे नॉन-एसी स्वरुपाचे असणार आहेत.

रेल्वे विभागाकडून होणाऱ्या मागणीनुसार नव्या कोचची निर्मिती केली जाते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात 4,485 डबे तयार केले जाणार असून त्यापैकी 2,605 सामान्य डबे असतील. तर उर्वरित अमृत भारत जनरल कोच आणि अमृत भारत स्लीपर कोचचा समावेश असेल. याशिवाय 32 उच्च क्षमतेच्या पार्सल व्हॅन आणि 55 पॅन्ट्री कार कोचची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

अनेक प्रकल्पांवर काम

भारतीय रेल्वे सर्वसामान्यांना आरामदायी आणि किफायतशीर प्रवास देण्यासाठी अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. याशिवाय अनेक नवीन गाड्यांचे संचालनही सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 2 अमृत भारत एक्स्प्रेस नॉन एसी गाड्यांचाही समावेश आहे. सामान्य लोकांना जलद आणि किफायतशीर प्रवास देण्यासाठी अमृत भारत एक्स्प्रेस ताशी 130 किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे.

50 नवीन अमृत भारत टेन

दरभंगा-अयोध्या-आनंद विहार आणि मालदा-बेंगळूर या मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या दोन गाड्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वेने 50 नवीन अमृत भारत गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे. केंद्र सरकार 1,000 नवीन पिढीच्या अमृत भारत गाड्या तयार करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, लांब पल्ल्याच्या वंदे भारत स्लीपर टेन आणि कमी अंतरासाठी वंदे भारत मेट्रोची चाचणी करण्याचा रेल्वेचा विचार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी 15 ऑगस्ट 2024 पासून वंदे भारत स्लीपर टेनची चाचणी सुरू होण्याची आशा व्यक्त केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article