For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमली पदार्थांविरोधात रेल्वेची धडक कारवाई

01:13 PM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमली पदार्थांविरोधात रेल्वेची धडक कारवाई
Advertisement

66 लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त : 11 जणांवर गुन्हे दाखल

Advertisement

बेळगाव : रेल्वेमधून अमलीपदार्थ व मद्य वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या विरुद्ध रेल्वेच्या आरपीएफकडून धडक मोहीम राबविण्यात आली आहे. मार्च 2026 मध्ये 66.86 लाख रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त करून 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे रेल्वेतून अमलीपदार्थांच्या वाहतुकीवर निर्बंध बसणार आहे.

नैर्त्रुत्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी अमलीपदार्थविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मद्य वाहतुकीची 11 प्रकरणे उघडकीस आली असून 66,800 रुपये किमतीच्या 163 बाटल्या जप्त करत अबकारी विभागाकडे सोपविण्यात आल्या. 106.66 किलो वजनाचा 66.86 लाख रुपयांचा गांजा जप्त करून 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

हरवलेल्या 37 मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरुपपणे सोपविण्यात आले. दोन वृद्ध महिलांना पडताळणी करून कुटुंबाकडे देण्यात आले. मेरी सहेली उपक्रमांतर्गत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात आली. प्रवाशांच्या हरवलेल्या बॅगा तसेच लॅपटॉप, मोबाईल, दागिने व इतर 50.42 लाख रुपयांचे साहित्य परत करण्यात आले. रेल्वेचे साहित्य चोरणाऱ्या 18 जणांवर गुन्हे दाखल करून 4 लाख 62 हजार 695 किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.

तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

गर्दीच्यावेळी रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करण्यात येत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळेच नैर्त्रुत्य रेल्वेच्या अखत्यारित कर्नाटक व गोवा येथील विविध ट्रॅव्हल एजन्सीची कसून चौकशी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 28 दलालांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 2 लाख 6 हजार 967 रुपये किमतीची वैध तिकिटे व 15 लाख 88 हजार 185 रुपयांची वापरलेली तिकिटे जप्त करण्यात आली.

Advertisement
Tags :

.