महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेल्वे, एसटी स्थानक हाऊसफुल्ल

01:49 PM Nov 06, 2024 IST | Radhika Patil
Railway, ST stations housefull
Advertisement

दिवाळी सुट्टीचा परिणाम : प्रवासी संख्येच्या तुलनेत वाहतुक व्यवस्था तोकडी : खासगी वाहतूक सेवेकडून अडीच पट जादा दर

Advertisement

कोल्हापूर/ प्रतिनिधी :
दिवाळी सुट्टीमुळे रेल्वे, एसटी स्थानकांसह खासगी वाहतुकीच्या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हीच स्थिती आहे. वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत वाहतूक व्यवस्था तोगडी पडत आहे. यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बस मिळाली तर बसण्यासाठी सीट मिळेल, याची शाश्वती नाही, अशी स्थिती आहे.

Advertisement

एकीकडे एसटी महामंडळाने तिकीटामध्ये महिलांना 50 टक्के सवलत दिली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला जात आहे. यामुळे अगोदरच एसटी बस सेवा हाऊसफुल्ल होत आहे. यामध्ये दिवाळी सुट्टीमध्ये बहुतांशी प्रवासी एसटीचा वापर करतात. विशेषत: कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची एसटी बसस्थानक येथे गर्दी होत आहे. मुळातच एसटी महामंडळाकडे बसची संख्या अपुरी आहे. याचा परिणाम दिवाळीत होणाऱ्या गर्दीवेळी दिसून येत आहे. एसटीच्या कोल्हापूर विभागाने 250 हून अधिक एसटीच्या जादा बस मार्गस्थ केल्या आहेत. त्याही बस आता अपुऱ्या पडत आहेत. ज्यांनी पूर्वी तिकीट आरक्षित केली आहेत. त्यांचाच प्रवास सुखकर होत आहे. ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होत आहे.

गेल्या चार दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांनी हाऊसफुल्ल होत आहे. बसमध्ये बसण्यासाठी सोडाच उभारण्यासाठीही जागा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. असाच प्रकार रेल्वे स्थानकांवर होत आहे. रेल्वेचेही पुणे, मुंबईचे सर्व तिकीट आरक्षित झाली आहेत. जनरलमधून प्रवाशांना प्रवास करण्याची वेळ आली आहे. एकूणच कोल्हापुरात वाढती प्रवासी संख्येच्या तुलनेत प्रशासनाकडून पुरेशी वाहतुक सेवा देऊ शकत नाही, हे स्पष्ट होत आहे.

प्रवाशांची आर्थिक पिळवणूक, प्रशासनाची गांधारीची भूमिका
गर्दीचा फायदा काही खासगी ट्रॅव्हलर्स कंपनी घेत आहेत. मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी एसटीचे 400 रूपये तिकीट आहे. ट्रॅव्हलर्स कंपनी 800 पासून 1 हजारपर्यंत तिकिट दर आकारणी करत आहेत. प्रवाशीही गरज असल्याने जादा पैसे मोजून तिकीट घेत आहेत. यावर प्रादेशिक परिवहन मंडळाची गांधारीची भूमिका आहे.

घाईगडबड टाळा, जीव वाचवा
एसटीमध्ये अथवा रेल्वेमध्ये बसण्यासाठी सीट मिळावी म्हणून प्रवाशांची धडपड असते. यामध्ये पाकीट चोरणे, बसच्या पायऱ्यावरून जाताना पडणे असे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मध्यवर्ती बसस्थानक येथे कर्नाटकच्या एका बसच्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. प्रवाशांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article