रेल्वे कंपन्यांचे समभाग सुसाट
गुंतवणुकदारांचे वेधले लक्ष, आरव्हीएनएलचा समभाग चमकला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलीकडच्या काही दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात रेल्वेशी संबंधित कंपन्यांचे समभाग चांगलेच चमकताना दिसले आहेत. गुंतवणुकदारांचे रेल्वे कंपन्यांच्या समभागांकडे खासे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या पाच दिवसांच्या सत्रामध्ये आरव्हीएनएलसह 3 समभाग तेजीवर स्वार दिसून आले होते.
रेल विकास निगम लिमीटेड (आरव्हीएनएल)चा समभाग 5 दिवसांमध्ये 306 रुपयांवरून 387 रुपयांवर इंट्राडे दरम्यान पोहोचला होता. याचाच अर्थ समभागाने पाच दिवसांमध्ये गुंतवणुकदारांना 26 टक्क्यांचा परतावा दिला. याचदरम्यान आणखी एक कंपनी आरआयएफसी यांचे समभाग देखील 5 दिवसांच्या कालावधीत 20 टक्क्यांपर्यंत वाढले होते. 110 रुपयांवर असणारा कंपनीचा समभाग 133 रुपयांवर इंट्राडे दरम्यान कार्यरत होता. तसेच इरकॉन इंटरनॅशनल या कंपनीचे समभागसुद्धा 150 रुपयांवरून 178 रुपये प्रति समभाग इंट्राडे दरम्यान पोहोचले होते. रेल्वेशी संबंधीत कंपन्यांचे समभाग 5 दिवसांमध्ये पाहता सरासरी 19 टक्के वाढलेले आहेत. परिणामी गुंतवणूकदार मात्र या तेजीने चक्रावून गेले आहेत.
कारणे कोणती
तज्ञांच्या मते बाजारातील चांगला मूड रेल्वे कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी दाखवण्यात कारणीभूत ठरला आहे. नव्या वर्षामध्ये रेल्वे भाडेदरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. या वाढीमुळे रेल्वेच्या उत्पान्नामध्ये 600 कोटी रुपयांची भर पडू शकते, असेही बोलले जात आहे.