For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेडणे टनेल मधील चिखल हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरु

02:40 PM Jul 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पेडणे टनेल मधील चिखल हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरु
Advertisement

मयुर चराटकर
बांदा
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे येथे टनेलमध्ये जमिनीतून पाणी आणि चिखल येत असल्याने गोव्यातून सिंधुदुर्ग मार्गे धावणाऱ्या तब्बल पंधरा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. तर वीसहुन अधिक गाड्या मिरज पुणे व्हाया मुंबई वळविण्यात आल्या. याचा सगळ्यात जास्त फटका सिंधुदुर्ग मधील मुंबईत जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. सध्यस्थीतीत पेडणे टनेल मध्ये रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम सुरू ठेवले असून रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी टनेल मध्ये जात कामाची पाहणी केली यावेळी रेल्वेचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. सध्यस्थीतीत या ठिकाणी पाणी येत असून जास्तीत जास्त लवकर मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे. मात्र अचानक अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असल्याचे चित्र ठिकठिकाणी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.