‘द मँडलोरियन अँड ग्रोगू’चा ट्रेलर सादर
अँड ग्रोगू’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा पॅड्रो पास्कल स्टारर आणि त्याचा युवा शिष्य तसेच पुत्र ग्रोगूच्या यात्रेची एक अत्यंत आकर्षक झलक दाखविणारा आहे.
ग्रोगू स्वत:च्या पित्यासोबत यात्रा करत असतो, परंतु मोठे छोट्यांचे रक्षण करतात आणि मग छोटे मोठ्यांचे रक्षण करतात. पण मँडलोरियन स्वत:च्या आश्रिताचे रक्षण करण्यासाठी उपलब्ध नसेल तर काय असे मँडलोरियन म्हणत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. दुष्ट साम्राज्याचे पतन झाले आहे, रपंतु त्याचे वॉरलॉर्डस आता देखील पूर्ण आकाशगंगेत विखुरले गेले आहेत, न्यू रिपब्लिक ज्यासाठी रिबेलियनने संघर्ष केला होता, त्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याचदरम्यान दिग्गज मँडलोरियन इनामी शिकारी डिन जारिन आणि त्यांचा युवा शिष्य ग्रोगूची मदत घेतात अशी याची कहाणी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन फेवरू यांनी पेले आहे. तर कहाणीलेखन जॉन फेवरू, डेव फिलोनी, कॅथलीन केनेडी, डेव फिलोनी आणि इयान ब्राइस यांनी मिळून केले आहे. चित्रपटाला संगीत लुडविग गोरान्सन यांनी दिले आहे. हा नवा स्टार वॉर्स अॅडव्हेंचर फिल्म 22 मे रोजी इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.