हॉटेल, क्लब, पबवर छापे
06:58 AM Oct 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव पोलिसांची रात्री उशिरा कारवाई
Advertisement
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील हॉटेल, क्लब, पबवर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापे टाकले आहेत. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 40 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकून तपासणी करण्यात येत आहे.
Advertisement
हॉटेल, क्लब, पब चालविताना शासकीय नियम धाब्यावर बसवून चालविले जात असल्याच्या तक्रारीवरून ही तपासणी करण्यात आली आहे. काही ढाब्यांवरही तपासणी झाली आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस आयुक्तांबरोबरच पोलीस उपायुक्त नारायण बरमनी व शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला होता.
Advertisement
