For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : मलकापुरात लॉजवर छापा; चार पीडित महिलांची सुटका

05:29 PM Jan 07, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   मलकापुरात लॉजवर छापा  चार पीडित महिलांची सुटका
Advertisement

                     मलकापूर शास्त्रीनगर परिसरात बेकायदेशीर देहव्यापाराचा पर्दाफाश

Advertisement

कराड : कराडलगत मलकापूर येथील शास्त्रीनगर परिसरात असलेल्या नवरंग लॉजवर मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात देहव्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कारवाईत देहव्यापार चालविणाऱ्या एजंटसह दोन रूमबॉय अशा तिघांना अटक करण्यात आली असून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक व कराड शहर पोलिसांनी संयुक्तपणे केली. याप्रकरणी पोलीस हवालदार पुष्पा रामचंद्र चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की नवरंग लॉजमध्ये महिलांना बेकायदेशीररीत्या ठेवून देहव्यापार चालविला जात आहे. पाटील यांच्या पथकाने खात्री केल्यावर हे वास्तव खरे असल्याचे समोर आले. त्यानंतर बोगस गिऱ्हाईक पाठवून व्यवहाराची खात्री करण्यात आली. ठरल्याप्रमाणे १ हजार ५०० रुपये दर ठरवून महिला उपलब्ध करून दिल्यानंतर संकेत मिळताच पोलिसांनी रात्री १२.३० वाजता छापा टाकला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर,उपनिरीक्षक दीपक बागवे, तसेच निर्भया पथकातील पुष्पा चव्हाण, पोलीस हवालदार सागर बर्गे, प्रवीण पवार, दीपक कोळी, मयूर देशमुख, पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Advertisement

छाप्यात काय आढळले?
छाप्यात काऊंटर रूममध्ये तीन इसम आढळून आले. अंगझडतीदरम्यान रोख रक्कम, मोबाईल हँडसेट्स, डेली पॅसेंजर रजिस्टर तसेच पॅकेट्स मिळून आले. तपासात बोगस गिऱ्हाईकासाठी दिलेल्या ५०० रुपयांच्या तीन नोटा सापडल्याने व्यवहाराची खात्री झाली. या कारवाईत एकूण ४ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात सूरज बाळासो सोनवणे, अमोल अनिल देसाई, रामा आनंदा सकट यांनी संगनमताने देहव्यापार चालविल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्येक ग्राहकाकडून १ हजार ५०० रुपये घेऊन त्यातील ७०० रुपये महिलेला देऊन उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवली जात असल्याची बाब तपासात उघड झाली. लॉ जमधून चार महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांची सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.