For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोळीकोप्प येथे बेकायदा मुरुम उपसावर छापा

12:16 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोळीकोप्प येथे बेकायदा मुरुम उपसावर छापा
Advertisement

खाण-भूगर्भ खात्याची कारवाई : हिटाची मशीनसह 5 मोटारसायकली जप्त

Advertisement

बेळगाव : बेकायदा खाण व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी खाण व भूगर्भ खात्याकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कोळीकोप्प (ता. बेळगाव) येथील बेकायदा मुरूम उपसा व्यवसायावर छापा टाकून एक हिटाची मशीन आणि पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेली सर्व वाहने हिरेबागेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. खानापूर आणि बेळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा खाण व्यवसाय सुरू आहे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथकांची स्थापना केली आहे. सदर पथकात खाण व भूगर्भ, पोलीस, तहसीलदार, महसूल, वन खात्यातील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर पथके दोन्ही तालुक्यांमध्ये रात्रंदिवस गस्त घालत आहेत. या ठिकाणी बेकायदा खाण व्यवसाय सुरू आहेत. त्याठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे.

छापा पडताच व्यवसायिकांचे पलायन

Advertisement

बेळगाव तालुक्यात विशेष करून लॅटेराईट या बेकायदा खनिजासाठी खोदकाम सुरू आहे. यापाठोपाठ कोळीकोप्प गावात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या मुरुमसाठी खोदकाम सुरू आहे, अशी माहिती खाण व भूगर्भ खात्याचे अधिकारी बिंदन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नुकतीच हिरेबागेवाडी पोलिसांच्या मदतीने कोळीकोप्प येथील खोदकामाच्या ठिकाणी छापा टाकला. छापा पडताच तेथील खाण व्यवसाय बंद करून संशयितांनी पलायन केले. मात्र खोदकाम करण्यासाठी वापरली जाणारी हिटाची मशीन व पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून खाण व भूगर्भ खात्याकडून सातत्याने कारवाई सुरू असल्याने बेकायदा खाण व्यवसायात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement
Tags :

.