गर्भलिंग निदान करणाऱ्या रुग्णालयावर छापा
कोल्हापूर :
बेकायदेशिर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या औषधांची विक्री केली जात असल्याच्या संशयावरुन, शहरातील फुलेवाडी परिसरातील आणि वाडीरत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथील खासगी रुग्णालयावर जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाने गुऊवारी छापा टाकला. रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी कुसाळे, रुग्णालयाच्या बोगस डॉक्टर डी. बी. पाटील, साथिदार बजरंग जांभीलकर (यांचे पूर्ण नाव पत्ता समजला नाही.) या तिघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून मुदतीतील आणि मुदतबाह्य औषधाचा साठा, उत्तेजीत औषधे, एक सोनोग्राफी मशिन, डॉक्टर पदवीच्या बोगस प्रमाणपत्रे आदी साहित्य जप्त करण्यात आले.
बोगस डॉ. डी. बी. पाटील (देवकर पाणंद, कोल्हापूर) याने काही वर्षापूर्वी वाडीरत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे छोटेसे रुग्णालय सुरु केले. त्यानंतर त्याने दिड महिन्यापूर्वी शहरातील फुलेवाडी येथील तिसऱ्या केएमटी बस स्टॉपनजीक प्रतीक्षा या नावाने ऊग्णालय सुऊ केले होते. या दोन्ही रुग्णालयामध्ये बेकायदेशिरपणे गर्भलिंग चाचणी केली जात असल्याची माहिती स्त्री भ्रुण हत्या आणि चिकित्सा समितीच्या सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या गिता हासूरकर, अॅङ गौरी पाटील, धनश्री पाटील आदींना सुमारे चार- पाच महिन्यापूर्वी मिळाली. त्यांनी ही माहिती जिल्हाधिकारी व महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला दिली. त्यानंतर बोगस डॉ. पाटील याच्या फुलेवाडी आणि वाडीरत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथील रुग्णालयावर छापा टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्या गिता हासुरकर यांनी बोगस स्त्री रुग्ण उभा करुन, डॉ. पाटील याच्याशी संपर्क साधला. त्याच्या रुग्णालयात गर्भलिंग चाचणी केली जात असल्याची पडताळणी केली. या पडताळणीमध्ये गर्भलिंग चाचणी बरोबर गर्भपात सुध्दा केला जात असल्याचे समोर आले. त्यावरुन त्याच्या रुग्णालयावर छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी पहिल्यांदा शहरातील फुलेवाडी परिसरातील डॉ. पाटील याच्या रुग्णालयावर छापा टाकला. त्याला ताब्यात घेत, रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये पथकातील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकातील वैद्यकिय अधिकाऱ्यांना काही संशयास्पद औषधे सापडली. ही औषधे जप्त करण्यात आली. त्यानंतर या पथकाने डॉ. पाटील याच्या वाडीरत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे ही रुग्णालयाकडे मोर्चा वळविला. या ऊग्णालयातून डॉ. पाटील याच्या डॉक्टर मिळविलेल्या बनावट प्रमाणपत्राच्या पाच पदव्या जप्त करीत, मुदत संपलेली आणि मुदतीतील औषधाच्या साठ्याबरोबर उत्तेजीत औषधाच्या गोळ्या जप्त केल्या. त्याच्याकडे पथकातील अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. चौकशीमध्ये कोल्हापूरातील ढिसाळ गल्लीतील एका लॅबमध्ये गरोदर महिलाची सोनोग्राफी मशिनने तपासणी केली जात असल्याचे समोर आले. त्यावरुन शहरातील या लॅबवर छापा टाकला. या लॅबमधून पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी कुसाळे, बजरंग जांभीळकर या दोघांना ताब्यात घेत, त्याच्याकडून एक सोनोग्राफी मशिन जप्त केले. बोगस डॉ. पाटील, गुन्हेगार कुसाळे, जांभीळकर या तिघाविरोधी गुऊवारी रात्री उशिरा पर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
एक वर्षानंतर पुन्हा गर्भलिंग निदान केंद्र उघडकीस
शहरातील क्रांतिसिंह नाना पाटीनगर येथील एका घरात सुऊ असलेल्या बेकायदेशिर गर्भलिंग निदान केंद्रावर कारवाई करर्यात आली होती. त्यावेळी गर्भलिंग तपासणी करण्यापासून ते गर्भपाताच्या औषधांची विक्री करण्यापर्यंत सक्रीय असलेल्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दापाश करीत, या रॅकेटमधील अनेक बड्या माशांना करवीर पोलिसांनी गजाआड केले होते.
पोलिसाचा डॉक्टर झाल्याची बतावणी
बोगस डॉ. पाटील याच्या ऊग्णालयातून पाच बनावट पदव्याचे प्रमाणपत्रे जप्त करण्यात आले. त्याचबरोबर तो ऊग्णालयात येणाऱ्या ऊग्णांना पोलिसाचा डॉक्टर असल्याची बतावणी करीत, त्यांना पोलिसांच्या डोक्यावरील पोलीस अक्षर असलेली टोपी, त्याच्यासारखे बुट, गाडीच्या चावीला पोलीस दलाचा लोगो असलेले किचन दाखवित असे. ते सर्व साहित्य त्याच्या रुग्णालयातून जप्त करण्यात आले.
कुसाळे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार
बेकायदेशिर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी संशयीत सनी कुसाळे याच्या विरोधी सन 2016 आणि 2017 या दोन वर्षात कोडोली आणि राधानगरी पोलीस ठार्यात गुन्हे दाखल आहेत. या गुह्यात अटक झाल्यानंतर तो काही महिन्यापूर्वी कारागृहातून बाहेर आला आहे. बाहेर येताच गुऊवारी पुन्हा त्याला याच प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला जात आहे.