For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्कंडेयनगरातील जुगारी अड्ड्यावर छापा : पंधरा जुगाऱ्यांना अटक

06:01 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मार्कंडेयनगरातील जुगारी अड्ड्यावर छापा   पंधरा जुगाऱ्यांना अटक
Advertisement

70 हजार रोख रक्कम जप्त

Advertisement

बेळगाव : वाघवडेजवळील मार्कंडेयनगर येथील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 69 हजार 150 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी वाघवडेजवळील मार्कंडेयनगर परिसरात सुरू करण्यात आलेल्या जुगारी अ•dयावर छापा टाकला. पंधरा जणांना अटक करून त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा कलम 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अभिषेक रघुनाथ भोसले, राहणार नवी गल्ली, परशुराम दत्ताराम शिंदे, राहणार नाथ पै चौक, शहापूर, राहुल सदाशिव अगसगेकर, राहणार शिवाजीनगर, रोहित प्रल्हाद कांबळे, राहणार चव्हाट गल्ली, सागर अशोक पाटील, राहणार गांधीनगर, सुनील मारुती पात्रोट, राहणार फुलबाग गल्ली, शुभम संतोष शिंदे, राहणार टीचर्स कॉलनी, प्रकाश प्रभू नाईक, राहणार फुलबाग गल्ली, पिरिमल गणेश जालगार, राहणार कपिलतीर्थ देव गल्ली, भरमा चिन्नाप्पा पाटील, राहणार वाघवडे, महेश ईश्वर गोरल, राहणार वाघवडे, विनायक लक्ष्मण भादण्णावर, राहणार एसपीएम रोड, श्रीकांत राजू भस्मे, राहणार बाजार गल्ली, खासबाग, रोशन रवींद्र शिंदे, राहणार नवी गल्ली, शहापूर, मनीष असोडेकर, राहणार शिवाजीनगर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Advertisement
Tags :

.