होनगा औद्योगिक वसाहतीतील जुगारी अड्ड्यावर छापा
जुगाराच्या साहित्यासह दीड लाखाहून अधिक रोकड जप्त
बेळगाव : होनगा औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून काकती पोलिसांनी 20 जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 1 लाख 60 हजार 465 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे. होनगा औद्योगिक वसाहतीजवळ अंदरबाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मृत्युंजय मठद व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून 20 जणांना अटक केली. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा कलम 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
यासीन महम्मदहुसेन तहसीलदार, आरिफ मोहम्मदगौस शहापुरी, सर्फराज मोहम्मदगौस शहापुरी, फैजान अल्ताफ मुजावर, शानूर बाळाप्पा मुचंडी, आरिफ अझरुद्दीन मुल्ला, सुनील शिवाजी अष्टेकर, वसीम काशीम मुजावर, अल्ताफ काशीमसाब मुजावर, दस्तगीर अजमुद्दीन मुल्ला, आरिफ मोहम्मदशफीक काकतीकर, अतिफ रफिक सौदागर, प्रकाश शंकर बन्ने, सर्व राहणार काकती, मोहम्मद तय्युम जत्ती, राहणार मारुतीनगर, बेळगाव, मन्सूर दाऊदसाब बागवान, राहणार उज्ज्वलनगर, दस्तगीरसाब नूरअहमद देसाई, राहणार शिरुर, ता. हुक्केरी, साकलीन हरुण तंबाकवाले, राहणार उज्ज्वलनगर, शिराज अब्दुलगनी काझी राहणार गांधीनगर, गणपती रामाप्पा केंचवगोळ, जहाँगीर अब्दुल नायक दोघेही राहणार बसापूर, ता. हुक्केरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.