For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

रायबाकिनाची माघार

06:35 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
रायबाकिनाची माघार
Advertisement

वृत्तसंस्था, टोकियो

Advertisement

येथे सुरु असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील पॅन पॅसिफिक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून टॉप सिडेड इलिना रायबाकिनाने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

शुक्रवारी रायबाकिना आणि कॅनडाची लैला फर्नांडिझ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना आयोजित केला होता. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी रायबाकिनाने दुखापतीमुळे माघार घेतल्याने फर्नांडिझला पुढे चाल मिळाली. पुढील महिन्यात इंडियन वेल्स येथे होणाऱ्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेसाठी पूर्ण तंदुरुस्त होण्याच्या दृष्टीकोनातून रायबाकिनाने जपानमधील स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांना कळविला. रायबाकिनाने या स्पर्धेत गुरुवारी पुतिनसेव्हावर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात रेखीमोव्हाने माया जॉइंटचा 7-5, 5-7, 6-1, पोहानकोव्हाने अॅलिसीया पार्क्सचा 7-6, 7-3, 6-3 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.