जिल्हा बँकेच्या प्रशासकीय अधिकारीपदी राहुल शिंदे यांची नियुक्ती
बेळगाव : जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव विभागाचे सहकारी संस्थांचे सहनिबंधक कल्लाप्पा ओबण्णगोळ यांनी हा आदेश बजावला आहे. राहुल शिंदे यांचा कार्यकाळ नूतन संचालक मंडळ स्थापन होईपर्यंत असणार आहे. राहुल शिंदे यांनी गुरुवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. न्यायालयीन प्रक्रियेमुळे अद्याप संचालक मंडळ अस्तित्वात आलेले नाही. मात्र बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2021-25 च्या संचालक मंडळाचा कार्यकाळ बुधवार दि. 5 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे. यामुळे गुरुवार दि. 6 नोव्हेंबरपासून जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन संचालक मंडळाची निवड होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे.