महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोडोली अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी राहुल पाटील; तर उपाध्यक्ष पदी नितीन हुजरे

01:59 PM Jan 14, 2024 IST | Kalyani Amanagi
Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

Advertisement

कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोडोली अर्बन को - ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी राहुल प्रकाश पाटील यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी नितीन शिवाजी हुजरे (रा.पारगाव) यांची सर्वानुमते निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे यांनी जाहिर केले.

Advertisement

कोडोली अर्बन को - ऑप. बँकेची निवडणूक दि.३० डिसेंबर रोजी झाली या निवडणुकीत गोकुळ संचालक अमरसिंह पाटील व यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.जयंत पाटील, अध्यक्ष राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजषी शाहू आघाडीने विरोधी गटाचा एकतर्फी पराभव करून सर्वच्या सर्व १७ जागा जिंकल्या होत्या.

कोडोली ता. पन्हाळा येथील बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पन्हाळा तालुका सह. संस्थेचे उपनिबंधक नारायण परजणे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी राहुल प्रकाश पाटील यांचे नाव संचालक डॉ. जयंत पाटील यांनी सुचविले यास श्रीपती पाटील यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठी नितीन शिवाजी हुजरे यांचे नाव प्रकाश पाटील यांनी सुचविले त्यास सुभाष जद यांनी अनुमोदन दिलेवर हि निवड सर्वानुमते झाल्याचे जाहिर केले.

यावेळी सर्व नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदभार स्वीकारताना राहुल पाटील म्हणाले की बँकेचा सर्वांगीण उत्कर्ष करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून बँकेच्या सभासद संचालक कर्मचारी व ठेवीदार या सर्वांना विश्वासात घेऊनच बँकेचा कारभार पारदर्शकपणे करण्यात येईल यावेळी गोकुळ संचालक अमरसिंह पाटील, उदयसिंह पाटील, रमेश मेणकर, सचिन जाधव, मनोहर पाटील, बाळासाहेब माने, विवेक जाधव, लक्ष्मी चौगुले, मनीषा पाटील, आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. आभार रघुनाथ चौगुले यांनी मानले.

 

Advertisement
Tags :
kodolikodoli urban banktarunbharat
Next Article