महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राहुल नवीन ‘ईडी’चे नवे संचालक

06:52 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुढील दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारने 1993 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) नवीन संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. राहुल नवीन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. ते संजय कुमार मिश्रा यांची जागा घेतील. 1993 च्या बॅचचे अधिकारी राहुल नवीन यापूर्वी विशेष संचालक म्हणून कार्यरत होते. नियमित संचालकाची नियुक्ती होईपर्यंत त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता नव्या नियुक्तीनुसार राहुल नवीन हे केंद्रीय तपास संस्थेचे सर्वात वरिष्ठ अधिकारी बनले आहेत. त्यांनी ईडी मुख्यालयाचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

राहुल नवीन हे भारतीय महसूल सेवेचे (प्राप्तिकर) 1993 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 15 सप्टेंबर 2023 रोजी तपास संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला. तसेच सर्वात वरिष्ठ असलेल्या संजय कुमार मिश्रा यांच्यासोबतही यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article