For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राहूल नार्वेकर यांचा शरद पवार गटाला धक्का! अजित पवार समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली

06:02 PM Feb 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
राहूल नार्वेकर यांचा शरद पवार गटाला धक्का  अजित पवार समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली
NCP

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांना पाठींबा देणारे आमदार अपात्र ठरवावेत यासाठी शरद पवार गटाने दाखल केलेली याचिका विधानपरिषद अध्यक्षांनी फेटाळली आहे. तसेच अजित पवार गट हाच मुळ पक्ष असलाचा निर्वाळाही अध्यक्षांनी दिला आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पक्षाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी या शरद पवार गटाने विधानसभेत याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्याची सुनावणी आज सुरु असताना विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी काही नोंदी स्पष्ट केल्या.
यावेळी निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी शरद पवार गटाची याचिका फेटाळली. आणि अजित पवार यांच्या नेर्तृत्वाखालील पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा दिला. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेसंदर्भात दिलेल्या निकालाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळाल आहे.

दरम्यान निकालाचे वाचन करताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटाला प्रचंड बहुमत आहे, असे मला दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवार यांचा गट हाच मुळ राष्ट्रवादीचा गट असल्याचं जाहीर केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.