राज्य युवा काँग्रेस मुख्य सचिवपदी राहुल जारकीहोळी
प्रतिनिधी/ बेंगळूर
युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी यांची कर्नाटक राज्य युवा काँग्रेसच्या मुख्य सचिवपदी (जनरल सेक्रेटरी) निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकाळ संपल्याने राज्य युवा काँग्रेसच्या विविध पदांसाठी राज्यभरात ऑनलाईनद्वारे मतदान घेण्यात आले होते. 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत मतदान घेण्यात आले होते. यात मुख्य सचिवपदासाठी राहुल जारकीहोळी यांनी निवडणूक लढवत बाजी मारली आहे.
त्याचप्रमाणे राज्य युवा काँग्रेस अध्यक्षपदी एच. एस. मंजुनाथ यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी निखिल व्ही. शंकर यांची निवड झाली आहे. एच. एस. मंजुनाथ यांनी यापूर्वी युवा काँग्रेसचे कार्याध्यक्षपद व विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांना दिपीका रे•ाr यांचे आव्हान होते. मात्र, हे आव्हान मोडीत काढत मंजुनाथ यांनी विजय संपादन केला आहे.