राहुल गुप्ता यांना बढती
02:50 PM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : गोवा पोलिस खात्यात गुन्हा शाखा आणि सायबर गुन्हा विरोधी विभागाचे अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले आयपीएस पोलिस अधिकारी राहुल गुप्ता यांना बढती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाचे अवर सचिव राजेशकुमार सिंग यांनी जारी केला आहे. एकूण 14 आयपीएस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. राहुल गुप्ता हे 2017 च्या गटाचे अगमुट (एजीएमयूटी) कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आयआयटी दिल्लीमधून बी. टेक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) आणि एम. टेक (आयसीटी) पदवीधर आहेत. आयपीएस पोलिस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली, अऊणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवाकाळात त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्ष पदक, पोलिस महासंचालक पदक आणि अमृत सुरक्षा पदक बहाल करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement