खासदारांचा धक्काबुक्की करत राहुल गांधींची गुंडागर्दी
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका
राहुल गांधीची दादागिरी खपवून घेणार नाही.
कोल्हापूरः
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ईव्हीएम मशीन आणि एक देश एक निवडणूक या मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. चर्चेच्या सुरुवातील राहुल गांधींनी हिवाळी अधिवेशनात खासदारांना धक्काबुक्की केली यावर जावडेकरांनी टीका केली.
ते म्हणाले, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी खासदारना धक्काबुक्की केली. ही निषेधार्थ आहे. ही राहुल गांधीची गुंडागर्दीच आहे. त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही. हा आखाडा आहे का ? आखाड्यातही नियम असतात. कॉंग्रेसला २०२४ चा पराभव झोंबलेला आहे. इंडीया अलायन्स ला जनतेने तर नाकारलचं आहे, त्यासोबत या अलायन्समधील इतर पक्षही त्यांना इव्हीएम कींवा इतर मुद्यावर नाकारत आहेत.
यावेळी जावडेकर म्हणाले, जनता, मतदार त्यांच्या दृष्टकोनातून मत देतात. सामान्य मतदार तुमच्या जय किंवा विजयाचा विचार करून मतदान करत नाहीत. मतदाराला मुर्ख समजू नका.
लोकसभेत ३० जागा कॉंग्रेस ने जिंकल्या तेव्हा इव्हीएम योग्य होतं. मग विधानसभेत काय झालं. परावभातून शिका, आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. कधी इव्हीएमवर कधी एक देश एक निवडणूक या मुद्यावर विरोधकांकडून नुसता आकांततांडव सुरू आहे. कॉंग्रेसच नाचता येईना अंगण वाकडं असे झाले आहेत, असेही जावडेकर यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने जेवढा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला, तेवढा कॉंग्रेसच्या काळात कधीही झाला नाही. संविधानाची मोडतोड कॉंग्रेसने केली. आणीबाणीमध्ये सुद्धा आणि आत्ता सुद्धा केली. कॉंग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण घटना संपवून टाकली. गेल्या दहावर्षात संविधान, न्यायपालिका, कार्यपालिका या सर्वांच स्वातंत्र्य अबाधित राहिलं.