For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rahul Gandhi Claim PM Modi | पंतप्रधानांच्या नियंत्रणाबाहेर जातेय संपूर्ण व्यवस्था"; राहुल गांधींनी वर्तवला आणीबाणीसारख्या परिस्थितीचा अंदाज

03:42 PM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
rahul gandhi claim pm modi   पंतप्रधानांच्या नियंत्रणाबाहेर जातेय संपूर्ण व्यवस्था   राहुल गांधींनी वर्तवला आणीबाणीसारख्या परिस्थितीचा अंदाज
Advertisement

                       राहुल गांधींचा मोठा दावा; वर्षभरात मोदी पंतप्रधान राहणार नाहीत

Advertisement

Rahul Gandhi Claim PM Modi -कॉग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) नेहमी कोणत्यांना ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.. आज पुन्हा एकदा ते चर्चेत एका विधानामुळ चर्चेत आले..आहेत तस तर राहुल गांधी नेहमी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या संदर्भात वक्तव्य करत असतात....

पण आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे... राहुल गांधी यांनी पुढील एका वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर राहणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच देशात मोठे आर्थिक संकट येण्याची आणि लोकांच्या विरोधामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.......

Advertisement

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी ?

राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती... यावेळी त्यांनी देशातील आर्थिक परिस्थीती संदर्भात भाष्य केलं ते म्हणाले..इराण आणि अमेरिका यांच्याती वाढत्या तणावामुळे जगभरात इंधन संकट निर्माण झाले आहे. त्याशिवाय अनेक देशांना दरवाढीमुळे आर्थिक संकटाला समोरे जावं लागत आहे.अशात महागाई तसेच इंधन टंचाईबाबत वाद-विवाद सुरु आहेत.

पुढे राहुल गांधी म्हणाले, देशावर भयंकर अशी आर्थिक त्सुनामी येऊ शकते. इतकं मोठं आर्थिक संकट तुम्ही आयुष्यभरात पाहिलं नसेल त्यामुळे मला असं वाटत आहे की पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान नसतील.

पंतप्रधानांच्या भेटीचा किस्सा सांगताना ते म्हणाले, पूर्वी व्यवस्था पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नियंत्रणात होती, पण आता ती त्यांच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. त्याच्याशी भेटी दरम्यान ते शंकेने पाहत असतात. माझ्याकडे मोदींबद्दल बरीच माहिती आहे. त्यांना वाटते की माझ्या नियंत्रणाखाली असलेली व्यवस्था कोलमडत आहे आणि हे सगळं मला माहित आहे.

पुन्हा सांगतो माझ्या अंदाजानुसार, एका वर्षाच्या आत मोदी पंतप्रधान राहणार नाहीत.असा दावा त्यांनी केला आहे.. त्यांच्या या दाव्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे... राहूल गांधी यांच्या या दाव्यावर अद्याप भाजपकडुन कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये...पण भाजप नेते यावर काय प्रतिक्रीया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे..

Advertisement
Tags :

.